पुणे : छत्रपती शिवाजी महाराज ( Chhatrapati Udayanraj Bhosale ) यांच्या विषयी काही विकृत प्रवृत्तीकडून वारंवार अपमान तसेच आवाहन केले जात आहे. ही विकृत हटवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान आणि सन्मान जतन करण्यासाठी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आज पुण्यात राज्यभरातील विविध संघटनाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली आणि या बैठकीत येत्या 3 डिसेंबर रोजी रायगडवर आक्रोश मेळाव्याचे आयोजन ( Aakrosh Melawa at Raigad on December 3 ) करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
उदयनराजे भावूक - तीन दिवसांपूर्वी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी आक्रमक भूमिका घेतली होती आणि आज यावर निर्धार शिवसन्मानाचा यावर भूमिका स्पष्ठ करणार होते. आणि येत्या 3 डिसेंबर ला रायगड वर आक्रोश मेळावा आयोजित करण्यात येणार आहे, अशी भूमिका उदयनराजे यांनी मांडली. यावेळी उदयनराजे हे भावूक झाले होते.
आक्रोश मेळाव्याचे आयोजन - येत्या 3 डिसेंबरला उदयनराजे यांच्या नेतृत्वाखाली रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर शिवचरित्र वाचन होणार आहे आणि त्यानंतर आक्रोश व्यक्त होणार आहे. ज्या ज्या लोकांना वाटत आहे त्या त्या लोकांनी रायगडावर यावे, असे देखील यावेळी उदयनराजे म्हणाले.
पंतप्रधान-राष्ट्रपतींची भेट घेणार - राज्यपाल आणि त्रिवेदी यांच्याविषयी बोलताना उदयनराजे म्हणाले की याबाबत मी 3 तारखेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती यांची भेट घेणार आहे.आणि राज्यपाल यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार आहे. आणि या भेटी नंतर मी आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.