ETV Bharat / state

Bandh Against Governor : राज्यपाल विरोधात पिंपरी चिंचवड बंदची हाक ; छत्रपती संभाजी राजे होणार सहभागी

राज्यपालांकडून गेल्या काही महिन्यांपासून छत्रपती शिवाजी महाराज आणि बहुजन महापुरुषांच्याबद्दल वादग्रस्त आणि अवमानकारक वक्तव्ये केली जात (Pimpri Chinchwad Bandh against Governor) आहेत. याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये छत्रपती संभाजी सहभागी होणार आहे. ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले (Sambhaji Raje will participate in Bandh) आहे.

Bandh Against Governor
राज्यपाल विरोधात पिंपरी- चिंचवड बंदची हाक
author img

By

Published : Dec 8, 2022, 10:49 AM IST

पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबाबत अवमानकारक आणि वादग्रस्त विधाने केली जात आहेत. याच्या निषेधार्थ बहुजन महापुरुष सन्मान समितीच्या वतीने पिंपरी- चिंचवड बंदची हाक (Pimpri Chinchwad Bandh) देण्यात आली आहे. सकाळी सात ते सायंकाळी पाचपर्यंत कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. पिंपरीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सर्व आंदोलक जमणार असून तिथे छत्रपती युवराज संभाजी राजे (Chhatrapati Sambhaji Raje) आंदोलकांना संबोधित करणार आहेत.

राज्यपाल विरोधात पिंपरी- चिंचवड बंदची हाक

एक दिवस बंद : गेल्या काही महिन्यांपासून छत्रपती शिवाजी महाराज आणि बहुजन महापुरुषांच्याबद्दल वादग्रस्त आणि अवमानकारक वक्तव्ये केली जात आहेत. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात ढवळून निघाले आहे. सर्व स्तरातून अशा प्रकारची वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत, अशी भूमिका घेण्यात आली. पण, वक्तव्ये थांबली नाहीत. म्हणून आज बहुजन महापुरुष सन्मान समितीच्या वतीने पिंपरी- चिंचवड शहर एक दिवस बंद ठेवण्यात येणार (Sambhaji Raje will participate in Bandh) आहे.

धरणे आंदोलन : या बंदमध्ये विविध संघटना, पक्षांनी सहभागी व्हावे असे समन्वयक मारुती भापकर यांनी आवाहन केले आहे. या बंदमध्ये शंभरपेक्षा अधिक संघटना सहभागी होणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी शेकडो कार्यकर्ते, नागरिक जमा होणार आहेत. दुपारी बाराच्या सुमारास छत्रपती युवराज संभाजी राजे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले (Pimpri Chinchwad Bandh against Governor) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.