ETV Bharat / state

दौंड एमआयडीसीतील केमिकलयुक्त पाणी रस्त्यावर साचल्याने प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील कंपन्याचे दूषित पाणी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यावर साचून महामार्ग सेवा रस्त्याला ओढ्यांचे स्वरूप आले आहे.

author img

By

Published : May 24, 2021, 5:41 PM IST

daund midc chemical Water news
दौंड एमआयडीसीतील केमिकल युक्त पाणी साचल्याने राष्ट्रीय महामार्गाला ओढ्याचे स्वरूप

दौंड (पुणे) - कुरकुंभ येथील औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपन्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील कंपन्याचे दूषित पाणी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यावर साचून महामार्ग सेवा रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले आहे. याची दखल घेऊन दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांनी साचलेल्या पाण्याची पाहणी केली.

ग्रामस्थांची कारवाईची मागणी -

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यावर कंपन्यांचे केमिकल युक्त पाणी साचून त्याचा उग्र वास येत असल्याची तक्रार नागरिकांनी दौंडचे तहसीलदारांकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत त्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कुरकुंभ कार्यालयात बैठक घेतली. यात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकाऱ्यांसह काही ग्रामस्थही उपस्थित होते. त्यात ग्रामस्थांनी येथील औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणाबाबत तक्रारींचा पाढा वाचून संबंधितावर कठोर कारवाईची मागणी केली. दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी हा प्रश्न हाताळण्यासाठी पंधरा दिवसांचा वेळ मागितला आहे. तर संबंधितांना महामार्गावरील दूषित पाणी उचलण्याचे आदेश दिले आहेत.

तहसीलदारांच्या संबंधितांना सूचना -

या संदर्भात तहसीलदार संजय पाटील यांनी संबंधितांना महामार्गावरील पाणी तत्काळ उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच यापुढे अशा प्रकारे पाणी येणार नाही, याची दक्षता घेण्याचेही सांगितले आहे. जर यापुढे असा प्रकार आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता -

दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील प्रदूषणाचा प्रश्न गेली अनेक वर्षे सतावत असून येथील नागरिक जल आणि वायू प्रदूषणाने बेजार आहेत. याबाबत ग्रामस्थांनी अनेकवेळा आवाज उठवला. तसेच कित्येकदा आंदोलने केली, रास्ता रोको केले, लोकप्रतिनिधींनी अधिवेशन काळात याबाबत आवाज उठवला. मात्र, येथील प्रदूषणाचा प्रश्न सातत्याने पुढे येत आहे. यामुळे येथील जलस्त्रोत दूषित होत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. तसेच या पाण्यामुळे कुरकुंभ परिसरातील शेती नापिक होत आहे.

हेही वाचा - संकटकाळात वीज कर्मचारी आघाडीवर, त्यांना तात्काळ फ्रंटलाईन वर्कर म्हणून जाहीर करा - बावनकुळे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.