ETV Bharat / state

उपमुख्यमंत्र्यांना मुंबईत बसायचे असेल तर पुण्याचा पालकमंत्री बदलवा - चंद्रकांत पाटील - Food distribution Pune Chandrakant Patil

पुणे शहरातल्या अनेक रुग्णालयांत ऑक्सिजनचा तुटवडा आहे. ही परिस्थिती सुधारवयाची असेल, तर पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातच बसले पाहिजे आणि परिस्थिती नियंत्रणात आणली पाहिजे. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना जर मुंबईत बसायचे असेल तर पुण्याचा पालकमंत्री बदलवला पाहिजे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Change Guardian Minister Chandrakant Patil
चंद्रकांत पाटील टीका अजित पवार
author img

By

Published : Apr 21, 2021, 4:24 PM IST

पुणे - पुणे शहरातल्या अनेक रुग्णालयांत ऑक्सिजनचा तुटवडा आहे. ही परिस्थिती सुधारवयाची असेल, तर पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातच बसले पाहिजे आणि परिस्थिती नियंत्रणात आणली पाहिजे. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना जर मुंबईत बसायचे असेल तर पुण्याचा पालकमंत्री बदलवला पाहिजे, असे भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले.

प्रतिक्रिया देताना भाजप नेते चंद्रकांत पाटील

हेही वाचा - पुणे : सिरम इन्स्टिट्यूटकडून कोविशिल्ड लसीचे दर जाहीर

तसेच, कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करावे लागणे हे जरी बरोबर असले, तरी त्यानंतर जनतेचे होणारे हाल रोखण्यासाठी राज्य सरकारने काय केले. राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शन, तसेच ऑक्सिजनची कमतरता आहे. त्यावर सरकार काही करत नाही आणि लॉकडाऊन केले जात आहे, त्याने काय फरक पडेल, असा प्रश्न भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

आज पुण्यातल्या मॉर्डन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून गरजूंना अन्नाची पाकिटे देण्यात आली. यावेळी पाटील यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. यावेळी पाटील यांनी पुणे आणि राज्यातल्या परिस्थितीवर भाष्य केले. राज्यातल्या सर्व जिल्ह्यात तिथले पालकमंत्री उपस्थित आहेत की नाही, हे आता मुख्यमंत्र्यांनी पाहिले पाहिजे. मात्र, नगर चे पालकमंत्री हसन मुश्रीफ गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीत बोंबलत बसले आहेत, अशी टीका पाटील यांनी केली. तर, देवेंद्र फडणवीस यांच्या पुतण्याने घेतलेल्या लसीबाबत आपल्याला काही माहीत नाही. मात्र, हे सरकार कोरोना, वाझे, अनिल देशमुख प्रकरणावरून लोकांचे लक्ष विचलित व्हावे यासाठी आशा गोष्टींवर जास्त भर देत आहे, असा आरोप पाटील यांनी केला.

हेही वाचा - डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन गळती, 61 रुग्णांची प्रकृती गंभीर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.