पुणे - ठाकरे सरकारने शंभर दिवसात चांगल्या कामांना स्थगिती देण्यापेक्षा इतर काहीही कामे केली नाहीत. अवेळी पावसाने नुकसान झालेल्या 94 लाख हेक्टरवरील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. कर्जमाफीमध्ये फक्त पीककर्ज माफी मिळाली. मध्यम मुदतीची कर्जमाफी अजूनही मिळाली नसल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. भाजपने जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळाव्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी पाटील बोलत होते.
हेही वाचा - 'दूध भेसळखोरांना फाशी झाली पाहिजे'
पाटील म्हणाले, दोन लाखांपेक्षा जास्त कर्जाची वनटाईम सेटलमेंट केली. म्हणजे दोन लाखावरील कर्ज शेतकऱ्याने भरायचे. त्यानंतर सरकार कर्जमाफी देणार. असा बट्ट्याबोळ सरकारने केला आहे.
दिल्लीची दंगल आरएसएसने घडवली असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. यावर बोलताना पाटील म्हणाले सर्वसामान्य माणसाने दिल्ली दंगलीच्या सर्व क्लिप्स पाहिल्या आहेत. त्यात भारतातल्या देशविरोधी ताकदीचा हात होता की, भारताबाहेरील देशविरोधी ताकदीचा हात होता हे सर्वसामान्य माणसाला कळले आहे. प्रकाश आंबेडकरांनी म्हणून काय होणार काय होणार आहे.
हेही वाचा - जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच माणुसकीला काळीमा फासणारी घटना