ETV Bharat / state

Chandrakant Patil Face Mask : तोंडावर मास्क लाऊन फिरतायेत चंद्रकांत पाटील, पुन्हा शाईफेकीची धमकी - after ink threat

शाई फेकीची घटना आणि आज मिळालेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर (after ink threat) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज पिंपरी (pimpri chinchwad) मध्ये येतांना, चेहऱ्यावर विशिष्ट काचेचा मास्क परिधान केला (face mask use) होता. शाईफेक धमकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही खबरदारी घेतल्याची चर्चा आहे.

Chandrakant Patil Face Mask
चंद्रकांत पाटील तोंडावर मास्क लावुन
author img

By

Published : Dec 17, 2022, 7:02 PM IST

Updated : Dec 17, 2022, 7:35 PM IST

चंद्रकांत पाटील फिरतात आहे तोंडावर मास्क लावुन

पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे पिंपरी चिंचवड मध्ये आगमन झाले आहे. शाई फेकीची घटना आणि आज मिळालेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर (after ink threat) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज पिंपरी (pimpri chinchwad) मध्ये येतांना, चेहऱ्यावर विशिष्ट काचेचा मास्क परिधान (face mask use) केला होता. शाईफेक धमकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही खबरदारी घेतल्याची चर्चा आहे.

खबरदारी म्हणून तर फेसमास्क... : पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे आज फेसमास्कमध्ये पाहायला मिळाले. गेल्या आठवड्यात त्यांच्यावर शाईफेक झाली होती. तसेच, आज देखील त्यांना शाईफेक करण्याची धमकी सोशल मीडियावरून देण्यात आली होती. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी- चिंचवडच्या सांगवीत पवनाथडी जत्रेच उद्घाटन करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावली. पण, त्यांच्या चेहऱ्यावर असलेल्या फेसमास्क वरून चर्चा रंगली. शाईफेक ची घटना आणि धमकीमूळे त्यांनी खबरदारी म्हणून तर फेसमास्क लावलं नाही ना? अशीच चर्चा पाहायला मिळाली.

सोशल मीडियावरून धमकी : पिंपरी- चिंचवड शहरातील सांगवी येथे आज आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते एका कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. त्याअगोदर चंद्रकांत पाटील यांना सोशल मीडियावरून राष्ट्रवादीच्या सोशल मीडियाचा अध्यक्ष आणि इतर एकाने शाई फेकण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच, खबरदारी च उपाय म्हणून पिंपरी- चिंचवड च्या सांगवीत पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. रस्ते देखील रिकामे करण्यात आल्याचे चित्र होतं. सांगावीतील पवनाथडी जत्रे च्या ठिकाणी पोहचले तेव्हा, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर फेसमास्क होतं. त्यांना शाईफेक ची मिळालेली धमकी आणि घडलेली घटना यामुळं खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी फेसमास्क लावल्याची चर्चा होती.

काय होती घटना : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. या प्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण देत दिलगिरी देखील व्यक्त केली होती. मात्र, त्यांच्या वक्तव्यामुळे बहुजन समाज दुखावला गेला होता. तसेच, महाविकास आघाडी आक्रमक झाली होती. त्यामुळे त्यांनी विविध ठिकाणी आंदोलन केली. शनिवारी चंद्रकांत पाटील दौऱ्यावर असताना विविध संघटनांनी त्यांना विरोध दर्शविला होता. दरम्यान, चंद्रकांत पाटील हे पदाधिकाऱ्यांच्या घरातून चहा घेऊन परत येत असताना, त्यांच्या अंगावर, तोंडावर अचानक शाई फेकण्यात आली होती. या प्रकरणी तीन जणांना चिंचवड पोलिसांनी जाग्यावर ताब्यात घेतलं होते. त्यांच्यावर चिंचवड पोलिस ठाण्यात भादवी कलम 307, 353, 294, 500, 501, 120 (ब) 34 क्रिमिनल लॉ अमेंन्डमेंट ऍक्ट कलम 7 महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 37 (1)/135 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Last Updated : Dec 17, 2022, 7:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.