पुणे - सरकार आले असते तर विकास कामासंदर्भात कार्यकर्त्यांना सांगावे लागले नसते. मात्र, आता सरकार नसल्याने याबाबत सत्ताधाऱ्यांना सांगत राहा, असे वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. पुण्यात योग केंद्र, निसर्ग कट्टा आणि वाचनालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
हेही वाचा - 'जास्त नाटकं कराल तर दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल'
'कोथरुड मतदारसंघातून मी निवडणूक लढवताना हाहाकार उडाला होता. बाहेरचे येथे येऊन काय करणार, हे कोण बाहेरचे आले आणि यांचा कोथरुडशी काय संबंध, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तेव्हा मी पुणे पदवीधर आमदार असल्याचे सांगत होतो. पुण्यात माझे खूप नातेवाईक असून मी पुण्याचा जावई आहे. पण निवडणुकीत प्रचारावेळी याचा फायदा मी घेतला नाही, असे पाटील म्हणाले. यावेळी मनसेचा मोर्चा आणि दिल्ली निवडणुकीतील एक्झिट पोलवर त्यांनी बोलणे टाळले.
हेही वाचा - 'दिल्ली मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यास उशीर का? हा प्रकार धक्कादायक'