ETV Bharat / state

Chandrakant Patil Ink Attack : अखेर चंद्रकांत पाटलांनी मागितली माफी; अटक करण्यात आलेल्यांची सुटका करावी - Ink attack on Chandrakant Patil

भाजपचे ( Bharatiya Janata Party ) ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patal ) यांनी सोमवारी बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यावरील कथीत वक्तव्याप्रकरणी माफी मागितली ( Chandrakant Patal apologized ) आहे. तसेच शाई हल्ला ( ink attack ) करणाऱ्यांची सुटका करावी अशी मागणी देखील त्यांनी केली.

Ink attack on Chandrakant Patil
Ink attack on Chandrakant Patil
author img

By

Published : Dec 12, 2022, 8:54 PM IST

पुणे - भारतीय जनता पक्षाचे ( Bharatiya Janata Party ) ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patal ) यांनी सोमवारी बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यावरील वक्तव्यावरुन माफी ( Chandrakant Patal apologized ) मागीतली आहे. तसेच शाई हल्ल्याप्रकरणी ( Ink attack on Chandrakant Patil ) अटक केलेल्यांना सोडण्यात यावे असे चंद्रकांत पाटील म्हणाले. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शैक्षणिक संस्था चालवण्यासाठी सरकारी भीक मागितल्याचे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शनिवारी पिंपरी चिचवड त्यांच्यावर समता सैनिक दलासह, वंचित बहूजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकल्याची ( ink attack ) घटना घडली होती.

"भीक मागितली” हा शब्द वापरल्याने वाद - राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री असलेल्या पाटील यांनी “भीक मागितली” हा शब्द वापरल्याने वाद निर्माण झाला होता. या प्रकरणी भीम संघटनांनी चंद्रकांत पाटलांचा जाहीर निषेध व्यक्त केला होता. तसेत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली होती. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले होते. तसेच एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाला देखील अटक करणात आला होती. त्यावर विरोधी पक्षाने प्रहार करीत घटनेचा निषेध केला होता. शाईफेक करणाऱ्यावर लावण्यात आलेले कलम तालिबानी असल्याची टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली होती.

नकळतपणे शब्दाची चुक - छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांना आपण त्यांच्या शिकवणीचे पालन करत असल्याचे पाटील यांनी निवेदन दिले आहे. “मला त्यांच्या महान कार्याबद्दल खूप आदर आहे. तो शब्द मी माझ्या द्वंद्वात्मक भाषेत नकळतपणे उच्चारला असल्याने कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. त्या शब्दाबद्दल मी आधीच माफी मागितली आहे, असे पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा “मावळा”वर असे आरोप केले जात आहेत हे दुःखद असल्याचे देखील त्यांनी नमुद केले.

10 पोलिसांचे निलंबन - या शाई हल्ल्यात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी 10 पोलिसांचे निलंबन करण्यात आले होते. तसेच एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला अटक करण्यात आली होती. यावर चंद्रकांत पाटील यांनी माफी मागत या प्रकरणावर मला काही बोलायचे नाही. माझ्याबाजूने मी हा वाद इथेच संपवत आहे. तुम्हालाही हा वाद इथेच संपवा अशी माझी विनंती असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.