पुणे - राज्यात शिवसेनेचे राज्य येवो तसेच विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकू दे अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी केली असल्याचे शिवसेनेचे औरंगाबादचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. बुधवारी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले.
चंद्रकांत खैरेंनी गणपतीला अभिषेक करून प्रार्थना केली. सध्या सगळीकडे पाऊस सुरु आहे. मात्र मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे मराठवाड्यात दुष्काळ आहे. मराठवाड्याची जनता व शेतकरी सुखी समृद्धी राहू दे, त्यांची उन्नती होऊ दे अशी प्रार्थना श्रीमंत दगडूशेठ चरणी केल्याचे खैरेंनी सांगितले. शिवाय महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा भगवा फडकू दे आणि शिवसेनेचे राज्य येऊ दे एवढीच प्रार्थना गणरायाचे चरणी केली असल्याचे खैरे म्हणाले.