ETV Bharat / state

Chandrakant Bawankule On Eknath Khadse : कोणी उभं राहीलं तरी रक्षा खडसेंचाच विजयी, एकनाथ खडसेंना भाजपाचं प्रत्युत्तर

रावेरमध्ये कोणीही उभं राहिलं तरी, आगामी लोकसभा निवडणूकीत रक्षा खडसेच जिंकणार असल्याचा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केलाय. ते आज पुण्यात बोलत होते. तसंच रक्षा खडसे लोकसभा निवडणुकीत तब्बल दोन लाख मतांनी विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

Chandrakant Bawankule On Eknath Khadse
Chandrakant Bawankule On Eknath Khadse
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 13, 2023, 10:44 PM IST

चंद्रकांत बावनकुळे यांची प्रतिक्रिया

पुणे : रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास मी फारसा इच्छुक नाही. मात्र पक्षानं आदेश दिल्यास मी जबाबदारी पार पाडेल, असं राष्ट्रवादीचं आमदार एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपानेही प्रत्युत्तर दिले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष शेखर बावनकुळे म्हणाले की, रावेरात कोणी उभे राहीले तरी रक्षा खडसेंचा दोन लाख मतांनी विजय होणार असल्याचं वक्तव्य बावनकुळे यांनी केलंय. ते आज पुण्यात बोलत होते.

रक्षा खडसेच विजयी होणार : चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत एकनाथ खडसे रावेरमधून लढले तरी, त्या निवडणुकीत रक्षा खडसेच जिंकतील. नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कार्यकाळात आमच्या सर्व खासदारांनी उत्तम काम केलं आहे. रक्षा खडसे यांनीही मतदारसंघात चांगलं काम केलं आहे. त्या मतदारसंघात फिरल्या आहेत. त्यामुळं रावेरमध्ये कोणीही लढले तरी रक्षा खडसे विजयी होणार असल्याचा दावा बावनकुळे यांनी केलाय.

खडसेंना उभं करण्याची तयारी : राष्ट्रवादी काँग्रेसनं रावेर मतदारसंघातून एकनाथ खडसे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे. याबाबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सूचक विधान केलंय आहे. राष्ट्रवादीच्या जळगाव सभेत जयंत पाटील यांनी एकनाथ खडसे यांना उद्देशून रावेर लोकसभेचे धनुष्यबाण हाती घ्या, असे सांगितलं होतं. तर, एकनाथ खडसे यांनीही जयंत पाटलांच्या विनंतीला अनुकूलता दर्शवली आहे. आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, मी लोकसभा निवडणूक लढवण्यास फारसा इच्छुक नाही. पण, पक्षानं जबाबदारी दिली तर ती जबाबदारी पार पाडेन असं ते म्हणाले होते.

पक्षानं संधी दिल्यास विचार करणार : एकनाथ खडसे म्हणाले, रावेर लोकसभा मतदारसंघाची निर्मिती 1989 मध्ये झाली. तेव्हापासून रावेरमध्ये पोटनिवडणुकीसह एकूण 10 निवडणुका झाल्या आहेत. यापैकी ९ वेळा काँग्रेसचा पराभव झाला आहे. काँग्रेसनं केवळ एकच निवडणूक जिंकली आहे. एकेकाळी हा मतदारसंघ केवळ 13 महिने काँग्रेसकडं होता. ही जागा राष्ट्रवादीला मिळाल्या पक्षानं दिलेल्या संधीचा विचार करेन असं खडसे म्हणाले होते.

हेही वाचा -

CM Eknath Shinde On Viral Video : व्हिडिओ व्हायरल करण्याचा खोडसाळपणा; मराठा समाज आणि सरकारमध्ये दुही पसरवण्याचा प्रयत्न - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maratha Reservation: रात्री उशिरा जरांगे पाटील यांचा मुख्यमंत्र्यांशी फोनवरून संवाद...एकनाथ शिंदेंनी जरांगे पाटलांना काय सांगितलं?

Maratha Kranti Morcha : मराठा क्रांती मोर्चात जरांगे पाटलांच्या लेकीची उपस्थिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.