ETV Bharat / state

तेरा वर्षांचा 'विशेष' गिर्यारोहक; आशिया बुक ऑफ रॅकॉर्ड्सने केला गौरव

सेरेब्रल पाल्सी ही एक न्यूरोलॉजिकल समस्या आहे. यामुळे मुलांच्या मेंदूची वाढ सामान्यपणे होत नाही. अशी मुले मुक्तपणे शरीराच्या हालचाली करू शकत नाहीत. या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलाने पर्वतावर चढाई केली, असे सांगितले तर लवकर विश्वास बसणार नाही. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील एका मुलाने हे साध्य करून दाखवले आहे.

Kanad Pimpalnerkar
कणाद पिंपळनेरकर
author img

By

Published : Oct 6, 2020, 4:46 PM IST

पुणे : पिंपरी-चिंचवडच्या कणाद पिंपळनेरकर याने वयाच्या 13व्या वर्षी हिमालयात 13 हजार फुटांपर्यंत ट्रेकिंग केली. त्याच्या या यशाची दखल आशिया बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली आहे. हिमालयातील ‘गंगोत्री ते गोमुख' हा ट्रेक आणि ‘चंद्रशीला' पर्वतावर चढाई करून कणादने हा विक्रम प्रस्थापित केला. कणाद हा सेरेब्रल पाल्सी आजाराने ग्रस्त आहे. मात्र, दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने ट्रकिंग केले.

21 ते 25 सप्टेंबर 2019 या कालावधीत केलेल्या या पदभ्रमणाच्या पहिल्याच प्रयत्नात कणादने गंगोत्रीपासून गोमुखपर्यंत चढाई केली. मात्र, खराब हवामानामुळे आणि धोकादायक रस्त्यांमुळे समुद्रसपाटीपासून 12 हजार 400 फूट उंचावर असणाऱ्या भोजबास या ठिकाणापर्यंतच तो पोहोचू शकला. हा मार्ग गंगोत्रीहून एकेरी 14 किलोमीटरचा लांबीचा आहे.

आई-वडिलांसह कणाद
आई-वडिलांसह कणाद

केदारनाथ ते बद्रीनाथ या रस्त्यावर चोपता या ठिकाणी चंद्रशीला पर्वत आहे. चंद्रशीला पर्वतावरील 'तुंगनाथ' हे महादेवाचे जगातील सर्वात उंचीवरील मंदिर आहे. या चढाईत अरुंद पायवाट, अंगावर येणारा चढ आणि दाट धुक्यासोबत वाहणारे अतिथंड वारे यांचा सामना कणादला करावा लागला. गोमुखला 13 हजार फूट उंची गाठण्याची संधी हुकल्यानंतर कणादने जिद्दीने चंद्रशीला पर्वत माथ्यावर पोहोचत 13 हजार फूट उंची गाठली. माथ्यावरच्या मंदिरातील गंगामातेचे दर्शन घेऊन कणादने तेथे तिरंगा फडकवला.

मिळवलेल्या पुरस्कारांसह कणाद
मिळवलेल्या पुरस्कारांसह कणाद

आजपर्यंत कोणत्याही सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलाने अशी कामगिरी केलेली नाही. त्यामुळे कणादने केलेल्या या चढाईची 'आशिया बुक ऑफ रेकॉर्डस्' या संस्थेने दखल घेऊन त्याला ‘ग्रँड मास्टर’ या किताबसह, प्रमाणपत्र आणि मेडल देऊन सन्मानित केले. 'कणादच्या हिमालयातील या पहिल्याच कामगिरीची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'ने नोंद केल्याने त्याचा व आमचा आत्मविश्वास आणि आनंद द्विगुणीत झाला आहे. कणादसारख्या विशेष मुलांच्या पालकांनी मुलांची आवड लक्षात घेऊन त्यांना वाव दिल्यास प्रत्येकाला असे यश प्राप्त करणे शक्य आहे', अशी भावना कणादच्या आई दर्शना आणि वडील प्रशांत पिंपळनेरकर यांनी व्यक्त केली.

हा मुलगा आयुष्यात कधीही चालू शकणार नाही, असे तज्ञ डॉक्टरांनी सांगितले होते. तज्ञांच्या या म्हणण्याला शह देत कणादने प्राप्त केलेल्या यशाचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. कणाद चालावा, यासाठी आमच्या मुलाने व सुनेने खूप प्रयत्न आणि कष्ट घेतले आहेत. कणादने मिळवलेले यश हे त्याचेच फलित आहे, असे कणादच्या आजी-आजोबांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.