ETV Bharat / state

रमजान ईद साध्या पद्धतीनेच साजरी करा - मौलाना शबी अहसन काझमी

author img

By

Published : May 12, 2021, 5:33 PM IST

Updated : May 12, 2021, 7:28 PM IST

येत्या गुरुवारी किंवा शुक्रवारी (चंद्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी) सर्वत्र मुस्लीम बांधवांच्या वतीने रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे. वाढत्या कोरोनाग्रस्तांमुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व मुस्लीम बांधवांनी यंदाची ईद ही साध्या पद्धतीने आणि गोर-गरीब गरजू लोकांना मदत करून साजरी करावी, असे आवाहन मुस्लीम समाजाचे धर्मगुरू मौलाना शबी अहसन काझमी यांनी केले आहे.

मौलाना
मौलाना

पुणे - राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. वाढत्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मागील वर्षी प्रमाणे यंदाही मुस्लीम समाजाला पवित्र रमजान महिना कडक निर्बधांमध्येच मुस्लीम समाजाला साजरे करावे लागले. येत्या गुरुवारी किंवा शुक्रवारी (चंद्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी) सर्वत्र मुस्लीम बांधवांच्या वतीने रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे. यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह पुणे शहरात ही हाहाकार माजवला आहे. यामुळे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व मुस्लीम बांधवांनी यंदाची ईद ही साध्या पद्धतीने आणि गोर-गरीब गरजू लोकांना मदत करून साजरी करावी, असे आवाहन मुस्लीम समाजाचे धर्मगुरू मौलाना शबी अहसन काझमी यांनी केले आहे.

मौलाना यांच्याशी बातचित करताना प्रतिनिधी

आतापर्यंत शासनाच्या नियमांचे पालन केले पुढं ही करा

पवित्र रमजान महिन्यात मुस्लीम धर्मियांच्या वतीने एक महिना उपवास (रोजा) केले जाते. वाढत्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने कडक निर्बंध लावण्यात आले आहे. यामुळे ज्या पद्धतीने मागच्या वेळी टाळेबंदीमध्ये साध्या पद्धतीने घरी राहून ईद साजरी करण्यात आली होती. यंदाही त्याच पद्धतीने सरकारच्या नियमानुसार घरीच राहून ईद साजरी करावी. तसेच आपल्यामुळे कोणालाही त्रास होता कामा नये याच देखील भान ठेवत ईदच्या खरेदीसाठी गर्दी करू नये, असे आवाहनही मौलानांनी केले आहे.

लोकांनीही सरकारला सहकार्य करावे

पवित्र रमजान महिन्यात दिवसभर उपवास करून परमेश्वर म्हणजेच अल्लाची पूजा (इबादत) सर्व मुस्लीम धर्मीय नागरिकांनी ज्या पद्धतीने सरकारच्या नियमवलीनुसार केली आहे. तसेच पूढेही नियमांचे पालन करावे आणि विनाकारण बाहेर फिरु नये. आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. सरकार जे काही निर्णय घेईल त्याला सर्वांनी सहकार्य करावे, असेही यावेळी मौलाना यांनी सांगितले.

जास्तीत जास्त गरजूंना मदत करा

सदका, फितरा, खैरात या स्वरुपात गोरगरिबांना मदत करा. ईद मोठ्या उत्साहात न करता साध्या पद्धतीने साजरी करा, यातून शिल्लक राहणाऱ्या पैशातून गरजूंना मदत करा, असे आवाहनही यावेळी मौलानांनी केले केले.

हेही वाचा - ७२ वर्षीय वृद्ध महिला रुग्णालयातून बेपत्ता, पुणे शहरातील घटना

Last Updated : May 12, 2021, 7:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.