पुणे: युरोपमधील युद्ध, चीनकडून उत्तरेकडील सीमेवर चीनचे तैनात सैन्य, शेजारील देशांमधील राजकीय आणि आर्थिक अराजकता या सर्वांमुळे भारतीय सैन्यदलासाठी वेगळी परिस्थिती निर्माण होत आहे, असे मत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनी मंगळवारी केले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) 144 व्या अभ्यासक्रमाच्या पासिंग आऊट परेड (POP) पुण्यात झाली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, आपल्या सीमांच्या सुरक्षेसाठी, प्रदेशात शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी कटिबद्ध भारतीय सशस्त्र दल कटिबद्ध आहे.
मणिपूरमधील परिस्थितीबद्दल माध्यमांशी बोलताना सीडीएस चौहान म्हणाले, की सैन्यदल, आसाम रायफल्सच्या तुकड्या 2020 पूर्वी मणिपूरमध्ये तैनात करण्यात आल्या होत्या. मणिपूरमधील परिस्थिती बंडखोरीशी संबंधित नसून दोन जातींमधील संघर्ष आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवली आहे. सशस्त्र दल आणि आसाम रायफल्सने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.मणिपूरमधील आव्हाने पूर्णपणे संपलेली नाहीत. परंतु ईशान्येकडील राज्यातील परिस्थिती निवळेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. मणिपूरमध्ये 3 मे रोजी वांशिक दंगली सुरू झाल्यापासून झालेल्या संघर्षात मृतांची संख्या 80 हून अधिक झाल्याचे त्यांनी सांगितले.
-
Passing Out Parade of 144th NDA Course was conducted at Khetarpal Parade Ground, NDA, on 30 May 2023. Gen Anil Chauhan, Chief of Defence Staff reviewed the parade.A total of 1175 cadets participated in the parade of which 356 cadets were from the passing out course. pic.twitter.com/NonuxCJPD2
— PRO Defence Pune (@PRODefPune) May 30, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Passing Out Parade of 144th NDA Course was conducted at Khetarpal Parade Ground, NDA, on 30 May 2023. Gen Anil Chauhan, Chief of Defence Staff reviewed the parade.A total of 1175 cadets participated in the parade of which 356 cadets were from the passing out course. pic.twitter.com/NonuxCJPD2
— PRO Defence Pune (@PRODefPune) May 30, 2023Passing Out Parade of 144th NDA Course was conducted at Khetarpal Parade Ground, NDA, on 30 May 2023. Gen Anil Chauhan, Chief of Defence Staff reviewed the parade.A total of 1175 cadets participated in the parade of which 356 cadets were from the passing out course. pic.twitter.com/NonuxCJPD2
— PRO Defence Pune (@PRODefPune) May 30, 2023
सैन्यदलातील घडामोडींमध्ये एक नवीन क्रांती-कॅडेट्सना संबोधित करताना जनरल चौहान म्हणाले की, जागतिक भू-राजकीय व्यवस्था सतत बदलत आहे. सीडीएस जनरल अनिल चौहान म्हणाले की, मी पासिंग आऊट झालेल्या महिला कॅडेट्सचे अभिनंदन करतो. पुरूषांचे वर्चस्व मानले जाणाऱ्या ठिकाणातही यश मिळविल्याने मी महिला कॅडेट्सचे अभिनंदन करतो. तुमच्या पुरुष बांधवांप्रमाणे राष्ट्रहिताचे रक्षण करण्याची जबाबदारी निवडल्याचा आनंद वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
जागतिक सुरक्षा परिस्थिती चांगली नसलेल्या काळात आपण जगत आहोत. सैन्यदलामध्ये बहुतांश तंत्रज्ञानावर आधारित नवीन क्रांती होत आहे. भारताच्या सशस्त्र दलातही मोठ्या प्रमाणात बदल होणार आहेत-सीडीएस अनिल चौहान
हेही वाचा-