ETV Bharat / state

बेहिशेबी मालमत्ता प्रकरण, शिक्षण विभागातील 3 तत्कालीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शिक्षण विभागातील तीन माजी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्कालीन शिक्षणाधिकारी तुकाराम सुपे, विष्णू कांबळे अशी या अधिकाऱ्यांची नावं आहेत. त्यांच्याकडं बेहिशेबी मालमत्ता सापडल्यानं शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

Department of Education Unaccounted Assets Case
शिक्षणाधिकाऱ्यांच्या घरात बेहिशेबी मालमत्ता
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 6, 2023, 5:39 PM IST

अमोल तांबे यांची प्रतिक्रिया

पुणे : तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांच्या घरात बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे. आता त्याच शिक्षण विभागातील तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांवर पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सोलापूर विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी तुकाराम सुपे, त्यांची पत्नी, मुलगा तसंच सांगलीचे तत्कालीन शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानं शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.

3 कोटी 59 लाखांची मालमत्ता सापडली : गेल्या वर्षी टीईटी प्रकरणातील मुख्य आरोपी तुकाराम सुपे, यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडं एकूण 3 कोटी 59 लाखांची मालमत्ता प्राथमिक तपासात आढळून आली आहे. त्यांनी ही मालमत्ता भ्रष्ट मार्गानं मिळवल्यामुळं त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुन्हा दाखल केला आहे.

82 लाखांहून अधिक रकमेचा गैरव्यवहार : याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी सांगितलं की, पुणे, सोलापूर तसंच सांगली येथील तीन वेगवेगळ्या अधिकार्‍यांवर गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध सोलापुरात एकूण 5 कोटी 85 लाख रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच तत्कालीन शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांच्या पत्नीवर सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्यात 82 लाखांहून अधिक रकमेचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या तिन्ही अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. तपासात जी माहिती समोर येईल, त्यानुसार कारवाई केली जाईल. तसंच शिक्षण विभागाच्या वतीनं पत्रव्यवहार करण्यात आला आहे. यात 8 अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली होती. आता 4 अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे. - अमोल तांबे, अधीक्षक, लाचलुचपत विभाग

'या' 8 अधिकाऱ्यांची चौकशी सुरू : विजयकुमार सोनवणे, अधीक्षक वेतन जिल्हा परिषद सांगली वर्ग दोन, वंदना वळवी, गटशिक्षणाधिकारी (महाबळेश्वर) प्रतिभा सुर्वे, गटशिक्षणाधिकारी (शाहूवाडी, कोल्हापूर) विलास भागवत, गटशिक्षणाधिकारी (पाटण, सातारा) वि. ढेपे, गटशिक्षणाधिकारी, (अधीक्षक शालेय पोषण शिक्षण मंडळ, पुणे) शिल्पा मेनन, अधीक्षक (प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद पुणे), आर.एस.वालझदे, (गटशिक्षणाधिकारी हवेली, पुणे) प्रवीण अहिरे, विभागीय उपसंचालक अशी या आठ अधिकाऱ्यांची नावं आहेत.

हेही वाचलंत का -

  1. ओबीसी मराठा आरक्षण वाद ; तर मराठा शिल्लक राहणार नाही, छगन भुजबळ यांचा पुन्हा हल्लाबोल
  2. बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिलच्या स्मारकाबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
  3. आरोग्य विभागाला भ्रष्टाचाराचा 'आजार'; अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार, विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.