ETV Bharat / state

CORONA : अखेर 'त्या' मंगल कार्यालय मालकासह वधु-वर पालकांवर गुन्हा दाखल - वधुवराच्या पालकांवर गुन्हा

लग्न मालकांनी शासकीय नियमांचे पालन न करता पन्नासहुन आधिक लोकांना या लग्न सोहळ्याला आमंत्रित केले. यामध्ये मुंबईवरुन आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे संसर्ग सभारंभात सोशल डिस्टसिंग, मास्क न वापरणे, लग्नानंतर परतीचा कार्यक्रम केल्याने लग्न सभारंभात सहभागी झालेल्या नागरिकांमध्ये नवरा-नवरीसह 35 जणांना कोरोनाची लागण झाली व त्यांच्या संपर्कातील 400 जणांना क्वारंटाईन होण्याची वेळ आली.

Function hall manager
मंगल कार्यालय मालकासह वधु-वर पालकांवर गुन्हा दाखल
author img

By

Published : Jul 13, 2020, 1:14 PM IST

Updated : Jul 13, 2020, 2:24 PM IST

पुणे - जुन्नर तालुक्यातील साईसमता मंगल कार्यालयात एका विवाह सोहळ्यामुळे धालेवाडीयेथे कोरोनाचा समूहसंसर्ग वाढून कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे, असा आरोप धालेवाढीच्या सरपंचानी केला. तसेच या प्रकरणी त्यांनी धालेवाडी येथील 'वधू' आणि हिवरे बुद्रुक येथील 'वर' यांचे पालक आणि मंगलकार्यालय मालकाविरोधात जुन्नर पोलिसात गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक युवराज मोहिते यांनी याबाबतची माहिती दिली.

जुन्नर तालुक्यातील धालेवाडी येथील वधू आणि हिवरे बुद्रुक येथील वर यांचा विवाह सोहळा जुन्नर येथील साईसमता मंगल कार्यालयात पार पडला. या लग्न सोहळ्याला पन्नास स्थानिक लोकांची परवानगी देण्यात आली होती. मात्र लग्न मालकांनी शासकीय नियमांचे पालन न करता पन्नासहुन आधिक लोकांना या लग्न सोहळ्याला आमंत्रित केले. यामध्ये मुंबईवरुन आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे संसर्ग सभारंभात सोशल डिस्टसिंग, मास्क न वापरणे, लग्नानंतर परतीचा कार्यक्रम केल्याने लग्न सभारंभात सहभागी झालेल्या नागरिकांमध्ये नवरा-नवरीसह 35 जणांना कोरोनाची लागण झाली व त्यांच्या संपर्कातील 400 जणांना क्वारंटाईन होण्याची वेळ आली.

'त्या' मंगल कार्यालय मालकासह वधु-वर पालकांवर गुन्हा दाखल
या प्रकारानंतर जिल्हाधिकारी यांनी लग्न सभारंभासाठी घालुन दिलेल्या नियमावलीची पायमल्ली केल्याने, धालेवाढीच्या सरपंचानी मंगल कार्यालय मालक व वधु -वर मालकांवर जुन्नर पोलीसांत गुन्हा दाखल केला.

Last Updated : Jul 13, 2020, 2:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.