ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये कोयत्याने केक कापणाऱ्या बर्थडे बॉयवर गुन्हा दाखल

कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या बर्थडे बॉयवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

case registered against a birthday boy for cuting cake with a scythe in pimpri-chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये कोयत्याने केक कापणाऱ्या बर्थडे बॉयवर गुन्हा दाखल
author img

By

Published : Dec 8, 2020, 7:37 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) - कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा केल्याची घटना दापोडी येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी समीर सियाज बागसिराज (20) रा. दापोडी आणि सोहेल शेख या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा व्हीडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यापैकी समीर याला पोलिसांनी अटक केली असून सोहेस अद्यापही फरार आहे.

कोयत्याने केक कापताना युवक

कोयत्याने केक कापून केले सेलिब्रेशन -

शनिवारी आरोपी सोहेल याचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन त्याच्या मित्रांनी केले. यावेळी केक कापण्यासाठी कोयत्याचा वापर करण्यात आला. या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर बर्थडे बॉय सोहेल आणि त्याचा मित्र समीर या दोघांवर भारतीय हत्यार कायदा कलम 4 (25), (27), 35 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बर्थडेबॉय अद्याप फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

हेही वाचा - आता देश अशांत झाल्याशिवाय राहणार नाही; उद्याच्या बैठकीत केंद्राने 'हा' निर्णय जाहीर करावा - शेट्टी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.