दौंड : आषाढी वारीसाठी पंढरपूरला ( Pandharpur for Ashadi Wari ) जाणाऱ्या वारकऱ्यांकडून टोल आकारणी केल्याप्रकरणी ( Toll collection from Warkaris ) पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस येथील टोल प्लाझाचे अधिकारी आणि इतर तीन जणांवर यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा ( Crime against three persons at Yavat police station ) दाखल करण्यात आला आहे. शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबाबत हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.
टोलमाफीचे परिपत्रक जारी : याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ०७/०७/२०२२ रोजी महाराष्ट्र शासनाने आषाढी वारीकरिता जाणारे सर्व भाविक तसेच वारकरी यांच्या वाहनांना टोलमाफी केल्याबाबतचे परिपत्रक पारित करण्यात आले होते. त्याबाबतच्या सूचना लेखी व प्रत्यक्ष स्वरूपात यवत पोलिसांनी पाटस टोलनाका येथील अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या होत्या.
चार जणांवर गुन्हा दाखल : यानंतरदेखील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस येथील टोलनाक्यावर काही वारकऱ्यांना टोल माफ न करता, टोल वसुली करण्यात आली. टोलनाका प्रशासनाने महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचा भंग केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी स्वतः पाटस टोलनाक्याचे अधीकारी अजयसिंग ठाकुर, सुनिल थोरात व शिफ्ट इन्चार्ज विकास दिवेकर, टोल कर्मचारी बालाजी वाघमोडे यांच्या विरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे गु.र.नं ५५५/२०२२ भा.द.वि.क. १८८, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून तपास सुरू : सदर गुन्ह्याचा तपास दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदशनाखाली सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे हे करीत आहेत.
टोल प्रशासनाची मुजोरी थांबणार का : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस येथील टोल कंपनीकडून स्थानिक वाहनांनाही टोल आकारला जात असल्यावरून अनेकदा वादाचे प्रकार घडत आहेत. टोल आकारण्यावरून या ठिकाणी यापूर्वी अनेक शाब्दिक वादविवाद, हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. टोलनाका कर्मचारी व अधिकाऱ्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढली असल्याचे स्थानिक नागरिक आणि वाहन चालक सांगत असतात. आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांकडून टोल वसुली प्रकरणी टोल कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर तरी टोलनाका प्रशासनाची मुजोरी थांबणार का, असा प्रश्न वाहनचालक उपस्थित करीत आहेत.
On Occasion of Ashadi Ekadashi 2022
हेही वाचा : CM Eknath Shinde Meet Amit Shah : शिंदेंनी घेतली शहांची भेट; मंत्रीमंडळ वाटपाबाबत चर्चा
हेही वाचा : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते पद कोणाला मिळणार; सचिन अहिर यांचे स्पष्टीकरण