ETV Bharat / state

झोपलेल्या श्वानाच्या अंगावर कार घातली, चालकावर गुन्हा दाखल

सोसायटीच्या पार्किंगमध्ये झोपलेल्या श्वानाच्या अंगावर चारचाकी गाडी घालून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. येवलेवाडीतील ज्वेल्स सोसायटीत हा प्रकार घडला. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीसीटीव्ही
सीसीटीव्ही
author img

By

Published : Sep 9, 2021, 10:03 PM IST

पुणे - सोसायटीच्या पार्किंगमध्ये झोपलेल्या श्वानाच्या अंगावर चारचाकी गाडी घालून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. येवलेवाडीतील ज्वेल्स सोसायटीत हा प्रकार घडला. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीसीटीव्ही

विपूल मीरचंदानी (वय 35, रा. जेल्स सोसायटी), असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पद्मिनी पीटर स्टंप (वय 63 वर्षे), यांनी तक्रार दिली आहे. 3 सप्टेंबरच्या रात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, येवलेवाडीतील ज्वेल्स सोसायटीतील सी बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या नावाचा श्वान झोपला होता. यावेळी आरोपीने भरधाव वेगात कार चालवून झोपलेल्या श्वानाच्या अंगावर घातली. यामध्ये पांढऱ्या श्वानाचा पाठीचा कणा मोडला असून तो गंभीर जखमी झाला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.

हेही वाचा - Ganeshotsav 2021 : विविध प्रकारच्या मोदक खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.