ETV Bharat / state

Pune Car Accident : निरा देवघर धरणात कार कोसळून तिघांचा मृत्यू, वरंध घाटातील शॉर्टकट प्रवास ठरला जीवघेणा - पुणे आणि रायगडमधील वरंध घाटाचा रस्ता बंद

वरंध घाटमार्गे पुण्याहून महाडकडे जाणारी कार निरा देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोसळली. यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

निरा देवघर धरणात कोसळली कार
निरा देवघर धरणात कोसळली कार
author img

By

Published : Jul 29, 2023, 2:35 PM IST

पुणे : पुण्याहून वरंधघाट मार्गे कोकणात जाणाऱ्या मार्गावर भीषण अपघात झाला. या मार्गावरील भोर महाडमार्गावरील वरंध घाटात शिरगावच्या हद्दीतील नीरा देवघर धरणाच्या पाण्यात एक कार कोसळली. यात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला, याचा सध्या तपास सुरू आहे. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला असून यात तीनजण बुडाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कार पाण्यात कोसळली: राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर जास्त आहे. मुसळधार पावासामुळे दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे प्रशासनाने पुणे आणि रायगडमधील वरंध घाटाचा रस्ता बंद केला आहे. वरंध घाट बंद केल्यानंतरही काही बहाद्दर प्रशासनाचा आदेश मोडून त्या मार्गे प्रवास करत आहेत. या मार्गे प्रवास करणे 4 जणांना महागात पडले आहे. अपघातग्रस्त कारमधून चारजण कोकणाकडे जात होते. नीरा देवघर धरणात ही कार कोसळली असून यात तिघांचा मृत्यू झाला आहे. कारने प्रवास करणारे प्रवासी पुण्यातील असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान दुर्घटना झाल्याची माहिती मिळताच स्थानिक बचाव दल घटनास्थळी दाखल झाले. तसेच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कार पुण्यातील आहे. कारमधील चौघेजण कोकणाच्या दिशेने जात होते. वरंध घाटातून जात असताना चालकाला धुके आणि पावसामुळे रस्त्याचा अंदाज आला नाही. यामुळे कार रस्त्याच्या बाजुला असलेला कठडा तोडून निरा देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोसळली.

घाट रस्ता बंद : पुणे घाट माथ्यावर पाऊस जोरदार सुरु आहे. पावसामुळे घाटात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. यामुळे वरंध घाट बंद करुन ताम्हिनी घाटाचा पर्याय वाहतुकीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. परंतु वरंध घाटातून प्रवास कमी वेळेत होतो, त्यामुळे अनेक जण धोकादायक मार्गाने प्रवास करतात. वरंध घाटातील रस्ता 22 जुलै ते 30 2023 पर्यंत बंद केलेला आहे. याबाबतचे आदेश पुणे आणि रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. शनिवारची पहाट ही दुर्घटनेची ठरली. अमरनाथवरुन परतणारी भाविकांची बस आणि नागपूरवरुन नाशिकला जाणाऱ्या खासगी बसची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दोन्ही बसचा चुराडा झाला. या अपघातात 6 प्रवाशांचा मृत्यू झाला असून तब्बल 19 प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात मुंबई-नागपूर महामार्गावर झाला.

हेही वाचा-

  1. Accident on Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर अपघात मालिका सुरूच; कार अपघातात पतीचा मृत्यू, पत्नी आणि मुलगी जखमी
  2. Beed Accident: मित्राच्या लग्नाकरिता जाताना भरधाव कारचा अपघात, 3 मित्रांचा जागीच मृत्यू, एक गंभीर
  3. Road Accident News: ट्रॅक्टर कारच्या अपघातात कार चालकाचे शिर-धडापासून वेगळे; धुळे सोलापूर महामार्गावरील घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.