ETV Bharat / state

कपॅसिटर टाळेल रोहित्र अन् कृषीपंपाचे नुकसान

कपॅसिटरचा वापर प्रत्येक शेतकऱ्यांनी वापर करायला हवा. कपॅसिटर शेतकऱ्यांच्या कृषीपंपाला व विद्युत रोहित्राला जळण्यापासून वाचवू शकते.

कपॅसिटर
कपॅसिटर
author img

By

Published : Dec 5, 2020, 10:46 PM IST

बारामती – चार-पाचशे रुपयात मिळणाऱ्या एका कपॅसिटरचा वापर प्रत्येक शेतकऱ्यांनी वापर करायला हवा. हे कपॅसिटर शेतकऱ्यांच्या कृषीपंपाला व विद्युत रोहित्राला जळण्यापासून वाचवू शकते. शिवाय कपॅसिटर वापरल्यामुळे रोहित्रावर येणारा दाब सुमारे २५ टक्क्यांपर्यंत कमी होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात स्वत:ची गैरसोय टाळण्यासाठी योग्य क्षमतेचे कपॅसिटर वापरावे, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी केले आहे.

पिके करपतात, उत्पादनात घट होते-

बारामती परिमंडलात गतवर्षी रोहित्र जळण्याचे सरासरी प्रमाण ७.४७ टक्के आहे. तब्बल ६ हजार २६६ रोहित्र गतवर्षी नादुरुस्त झाले होते. तर यंदा झालेल्या मुबलक पावसामुळे चालू रब्बी हंगामात हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. साधारणपणे एक जळालेले, नादुरुस्त झालेले रोहित्र दुरुस्त करण्यासाठी किमान २४ हजार रुपयांचा खर्च होतो. त्याच्या क्षमतेनुसार ही किंमत आणखी वाढते. शिवाय ते बदलेपर्यंत महावितरणचा महसूल बुडतो. दुसरीकडे शेतकऱ्यांचे ही नुकसान होते. पिके करपतात, उत्पादनात घट होते. त्यामुळे रोहित्र नादुरुस्त होणे महावितरण व शेतकरी दोघांनाही परवडणारे नाही.

प्रात्यक्षिके दाखवून शेतकऱ्यांना वापरण्याचे आवाहन-

मुख्य अभियंता सुनील पावडे, अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील, कार्यकारी अभियंता गणेश लटपटे व कर्मचाऱ्यांनी स्वता माहिती दिली. त्यांनी शुक्रवारी दुपारी भिगवण उपकेंद्रासमोर असलेल्या उजनी धरणाच्या बॅक वॉटरवर चालू असलेल्या कृषीपंपावर शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखवले. तसेच कपॅसिटर वापराचे फायदे शेतकऱ्यांना सांगितले.

कपॅसिटर हाच एकमेव उपाय-

प्रात्यक्षिकावेळी कपॅसिटर शिवाय लागणारा करंट कपॅसिटरच्या वापरामुळे साधारणपणे २९ टक्‍क्यांनी कमी लागला. रोहित्र व कृषीपंप वाचवायचे असतील. तर कपॅसिटर हाच एकमेव उपाय आहे. कपॅसिटरमुळे वीजभार कमी होतो. मोटारीचे कंपन कमी होते. पाण्याचा विसर्ग वाढतो. रोहित्र व कृषीपंपाची कार्यक्षमता व आयुर्मान सुधारते. वितरण हानी टळून शेतकरी व कंपनी दोघांचाही फायदाच होतो व गैरसोयही टळते.

हेही वाचा- शरद पवार यांचा सल्ला वडिलधाऱ्यांसारखा घ्यावा; यशोमती ठाकुरांच्या ट्विटनंतर राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

हेही वाचा- महाराष्ट्र कोरोना अपडेट : राज्यात ४,९२२ नवीन रुग्णांचे निदान, ९५ रुग्णांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.