ETV Bharat / state

Pune Crime: 'तसल्या' कामासाठी मुलगी देतो म्हणून सेल्स मॅनेजरला बोलावले अन् अपहरण करून उकळले पैसे - पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune Crime: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात हा प्रकार घडला असून 17 आणि 19 वर्ष वयाच्या 4 तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांवर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

Pune Crime
Pune Crime
author img

By

Published : Dec 6, 2022, 10:50 PM IST

पुणे: पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी ही वाढत असून विविध माध्यमातून गुन्हेगारी ही वाढत चालली आहे. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात महाविद्यालयीन मुलीकडून शरीर संबंधासाठी मुलगी देतो, असे सांगून 53 वर्षीय व्यक्तीला बोलावून घेतले होते. त्यानंतर त्याच्या मित्राकडून मारहाण करत त्याचे अपहरण करून पैसे उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सेल्स मॅनेजरला बोलावले अन् अपहरण करून उकळले पैसे

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात हा प्रकार घडला असून 17 आणि 19 वर्ष वयाच्या 4 तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी धीरज वीर (वय 19) आणि जॉय मंडल (वय 19) यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांवर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी मुख्य आरोपी मुलगी कांचन उर्फ डींगी वय (19) वर्ष हिला देखील अटक करण्यात आली आहे.

बंडगार्डन परिसरात बोलावून घेतले: या प्रकरणी विश्रांतवाडी परिसरातच राहणाऱ्या एका 53 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. 3 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत हा सर्व प्रकार घडला आहे. फिर्यादी हे एका नामांकित कंपनीत सेल्स मॅनेजर कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची एका लॉजवर आरोपी तरुणांसोबत ओळख झाली होती. काही दिवसांपूर्वी त्यांने फिर्यादी याला शरीर संबंधासाठी मुलगी देतो, असे बोलून बंडगार्डन परिसरात बोलावून घेतले. त्याच्याबरोबर त्याचे मित्र देखील आले होते. फिर्यादी त्या ठिकाणी स्वतःच्या गाडीने आले असता या सर्व आरोपीने जबरदस्ती करत आणि मारहाण करत फिर्यादी यांचे अपहरण केले. मारहाण करत फिर्यादी यांचे एटीएम कार्ड काढून घेतले, आणि येरवडा परिसरातील एका एटीएममधून 25000 रुपये त्यांनी जबरदस्तीने काढले.

अशी देखील धमकी दिली: आरोपींनी फिर्यादी यांना मुलीसोबत लॉजवर जातो, हे पत्नीला सांगून बदनामी करतो अशी धमकी दिली. याविषयी पोलिसांना सांगितले तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला ठार मारतो, अशी देखील धमकी दिली होती. त्यानंतर वेळोवेळी फिर्यादी यांच्याकडून तब्बल 93 हजार रुपये खंडणी स्वरूपात आरोपींनी उकळले. दरम्यान आणखी पैशाची मागणी होत असल्याने फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून 2 आरोपींना अटकही केली आहे.

पोलिसांची संपर्क साधावा: पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून अशा घटनांमध्ये वारंवार वाढ होताना दिसून येत आहे. स्वतःची बदनामी होत असल्याच्या कारणांनी काही लोकांसमोर येत नाही आणि मोठे पाऊल उचलतात. पण अशावेळी नागरिकांनी पोलीस चौकी तसेच पोलिसांची संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर यांनी केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.