ETV Bharat / state

"सॉरी गुड्डी, बाय बाय डिप्रेशन," फेसबुकवर पोस्ट टाकून पुण्याच्या प्राध्यापकाची आत्महत्या - सासवड परिसरात विहिरीत उडी मारून आत्महत्या

प्रफुल मेश्राम हे पुण्यातील कमिन्स महाविद्यालयात प्राध्यापक होते. मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्याने फेसबुक अकाउंटवर 'बाय-बाय डिप्रेशन, सॉरी गुड्डी' अशी पोस्ट टाकली होती. त्यानंतर त्यांनी पुरंदर तालुक्यातील भिवरी गावात रस्त्यालगत असणार्‍या एका विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

"Bye bye Depression, Sorry Goody" Professor's suicide by posting on Facebook
"बाय बाय डिप्रेशन, सॉरी गुड्डी फेसबुकवर पोस्ट करून प्राध्यापकाची आत्महत्या
author img

By

Published : Jul 14, 2021, 12:51 PM IST

Updated : Jul 14, 2021, 4:59 PM IST

पुणे - येथील एका नामांकित महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या एका व्यक्तीने फेसबुकवर पोस्ट टाकत पुण्याजवळच्या सासवड परिसरात विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. प्रफुल दादाजी मेश्राम (वय 46) असे आत्महत्या केलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. सासवड पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

मुलीला सॉरी म्हणत केली शेवटची एफबी पोस्ट -

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, प्रफुल मेश्राम हे पुण्यातील कमिन्स महाविद्यालयात प्राध्यापक होते. मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्याने फेसबुक अकाउंटवर 'बाय-बाय डिप्रेशन, सॉरी गुड्डी' अशी पोस्ट टाकली होती. त्यानंतर त्यांनी पुरंदर तालुक्यातील भिवरी गावात रस्त्यालगत असणार्‍या एका विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

विहिरीत आढळला मृतदेह -

प्रफुल्ल मेश्राम यांनी फेसबुकवर टाकलेली पोस्ट पाहून त्यांच्या मित्रांनी शोधाशोध सुरू केली. फेसबुकवरील लोकेशननुसार ते सासवड परिसरात असल्याचे समजल्यानंतर सासवड पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी शोधाशोध केली असता भिवरी येथील एका विहिरीजवळ चप्पल, गाडीची चावी, पॉकेट, मोबाईल, हेडफोन, रुमाल या वस्तू दिसून आल्या. त्यानंतर पोलिसांनी या विहिरीत शोधाशोध केली असता मेश्राम यांचा मृतदेह सापडला. मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. प्रफुल मेश्राम यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

हेही वाचा - धक्कादायक: पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीची पोलीस ठाण्यात आत्महत्या

Last Updated : Jul 14, 2021, 4:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.