ETV Bharat / state

पुणे-सोलापूर महामार्गावर मीनी बस व कंटेनरचा अपघात; चालकाचा मृत्यू - पुणे-सोलापूर महामार्ग लेटेस्ट अपघात

दौंड तालुक्यातील यवत येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मिनी ट्रॅव्हल्स व कंटेनरचा अपघात झाला. या अपघातात बस चालकाचा मृत्यू झाला. कंटेनरमधील लोखंडी गज महामार्गावर पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.

bus
बस
author img

By

Published : Jan 10, 2021, 1:29 PM IST

पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील यवत येथे मिनी ट्रॅव्हल्स व कंटेनरचा अपघात झाला. या अपघातात ट्रॅव्हल्स चालकचा मृत्यू झाला. अपघातात कंटेनरमधील लोखंडी गज महामार्गावर पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.

पुणे-सोलापूर महामार्गावर मीनी बस व कंटेनरचा अपघात झाला

दुभाजक ओलांडून बसची कंटेनरला धडक -

दौंड तालुक्यातील यवत येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास हॉटेल अन्नपूर्णा जवळ मिनी बस महामार्गाचा दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरला धडकली. बसने धडक दिल्यानंतर कंटेनर दुभाजकावरून सोलापूरवरून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर गेला. त्यामुळे कंटेनरमधील लोखंडी गज रस्त्यावर पडले. बस देखील महामार्गवरच आडवी पडली.

बस चालकाचा मृत्यू तर, जखमींवर उपचार सुरू -

या अपघाताचा मोठा आवाज झाल्याने लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या अपघातानंतर मिनी बसचा चालक बसमध्ये अडकला होता. त्याला गंभीर दुखापत झाली होती. पोलिसांनी आणि इतर नागरिकांनी त्याला बाहेर काढून रुग्णालयात पाठवले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा यवत येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. गजानंद प्रल्हादराई अग्रवाल, असे या चालकाचे नाव होते. या अपघाताबाबत कंटेनर चालक परशु मिलिंद मोहिते यांनी यवत पोलीस ठाण्यात येथे फिर्याद दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.