पुणे: पुणे-नगर महामार्गावर (Pune Nagar highway) आज सकाळी एक प्रवासी बस उलटल्याची घटना घडली आहे. रांजणगावजवळ (ranjangaon) ह्या प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १० प्रवासी जखमी झाले असून बचाव कार्य सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. रांजणगाव पोलिस घटना स्थळी दाखल झाले असून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये ४५ प्रवासी प्रवास करत होते. त्यातील १० जखमी झाले असून पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.
पहाटेच्या सुमारास पुण्यातून नगरच्या दिशेने ही बस निघाली होती. रांजणगाव येथे चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस उलटली. या घटनेने रांजणगाव येथे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी रांजणगाव पोलिस तातडीने मदत कार्य करत आहेत.