ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये घरफोड्या, दुचाकी चोरणारे चोरटे जेरबंद; एकूण 15 लाखांचा मुद्देमाल हस्तगत - Pimpri-Chinchwad breaking news

पिंपरी-चिंचवड शहरात मौज मजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून दुसऱ्या कामगिरीत घरफोडी करणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात आलं आहे.

Burglars arrested in Pimpri-Chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये घरफोड्या, दुचाकी चोरणारे चोरटे जेरबंद
author img

By

Published : Mar 6, 2021, 6:57 PM IST

पुणे (पिंपरी) - पिंपरी-चिंचवड शहरात मौज मजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून दुसऱ्या कामगिरीत घरफोडी करणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात आलं आहे. दुचाकी चोराकडून 5 लाख 30 हजारांच्या 13 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. तर, घरफोडी प्रकरणात 17 तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम सहा हजार, 2 दुचाकी असा 9 लाख 78 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. दोन्ही कारवाईमध्ये ऐकून 15 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये घरफोड्या, दुचाकी चोरणारे चोरटे जेरबंद; एकूण 15 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
तीन आरोपींना ठोकण्यात आल्या बेड्या-
दिलीप विश्वनाथ काळे आणि रवी उर्फ रोहित अनिल मारवे अशी घरफोडया करणाऱ्या आरोपींची नावे असून अक्षय अनिल काशीद अस मौज मजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
पहिल्या कारवाईमध्ये घरफोडी करणारे आरोपी जेरबंद-
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या कारवाईमध्ये वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी प्रशांत गिलबिले, सूरज सुतार आणि तात्या शिंदे यांना बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, ताथवडे परिसरात दोन व्यक्ती संशयितरित्या थांबल्या असून ते घरफोड्या करणारे सराईत गुन्हेगार आहेत. त्यानुसार, त्या ठिकाणी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले, त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी 13 घरफोड्या केल्याचं उघड झाले आहे. त्यांच्याकडून एकूण 9 लाख 78 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
दुचाकी चोरणारा चोरट्याला बेड्या, 13 दुचाकी जप्त-
दुसऱ्या कारवाईमध्ये पोलीस कर्मचारी बिभीषण कण्हेरकर, नितीन गेंगजे आणि विक्रम कुदळे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, वाकड परिसरातील हॉटेल अंबियन्स येथे एक दुचाकी चोरणारा चोरटा थांबला असून त्याला वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून 5 लाख 30 हजारांच्या 13 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. तो मौज मजेसाठी दुचाकी चोरत असल्याचं पोलीस तपासा समोर आले आहे.
वाकडच्या पोलीस पथकाची कामगिरी-.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.विवेक मुगळीकर, गुन्हे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव, सिद्धेश्वर बाबर, पोलीस कर्मचारी सूरज सुतार, प्रशांत गिलबिले, बिभीषण कण्हेरकर, तात्या शिंदे, बापूसाहेब धुमाळ, बाबाजान इनामदार, नितीन ढोरजे, राजेंद्र मारणे, शाम बाबा, सचिन नरुटे, विजय गंभीरे, विक्रम कुदळे, जावेद पठाण, विक्रम जगदाळे, नितीन गेंगजे, प्रमोद कदम, कौतेय खराडे, नूतन कोंडे यांनी केली आहे.

हेही वाचा- अभिनेत्री सुलोचना लाटकर दादासाहेब फाळके पुरस्कारापासून वंचित का? सरकारला सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.