पुणे- बारामती तालुक्यातील सांगवी येथे झालेल्या घरफोडीचा तपास करताना पुणे जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नागपुरातून बंटी व बबलीला अटक केली. या पती-पत्नीने राज्यासह कर्नाटकात तब्बल 19 गुन्हे केल्याचे तपासात उघड झाले आहे. नवनीत मधुकर नाईक (वय ४०) व प्रिया नवनीत नाईक (वय ३६ रा. विजय निवास, रेडीस चाळ, शिवाजीनगर, भांडुप पश्चिम मुंबई ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
गतवर्षी दोन डिसेंबर रोजी बारामती येथील सांगवीमध्ये घरफोडी झाली होती. या घरफोडीत ३ लाख ३६ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेली होती. राहुल सदाशिव तावरे यांनी याबाबत पोलिसांत दिली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट व त्यांच्या पथकाने सुरू केला होता. या गुन्ह्यातील आरोपी नागपूर येथे राहत असल्याची माहिती पथकाला मिळाली. या पथकाने सापळा रचत दोघांना ताब्यात घेऊन अटक केली. दोन्ही आरोपींनी सांगवीतील गुन्ह्याची कबुली दिली.
हेही वाचा-सरकारचा उद्योगांशी संबंध नाही- पंतप्रधान नरेंद्र मोदी
या ठिकाणी केल्या घरफोड्या-
दोघा पती-पत्नीविरोधात राज्यासह कर्नाटकात तब्बल १९ चोरीचे गुन्हे दाखल आहेत. भोर, लोणावळा, कोपरगाव (नगर), पोयनाड (रायगड), मोरा सागरी (नवी मुंबई), लोणंद, बडनेरा(अमरावती), पेठवडगाव (कोल्हापूर), शहापूर (ठाणे), रत्नागिरी, छावणी (नाशिक), कारंजा (वाशिम), मिरज (सांगली), सदर बझार (जालना), वाशी (नवी मुंबई), रबाळे (नवी मुंबई), के. आर. पूरम (बेंगलोर) या ठिकाणी 19 गुन्हे दाखल आहेत.
हेही वाचा-केंद्रीय मंत्रिमंडळाकडून औषधी कंपन्यांकरता पीएलआय योजना मंजूर