पुणे Bull Sagar Utsav In Pune : सध्या दिवाळी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जात असून आज (बुधवारी) दिवाळीची भाऊबीज देखील मोठ्या उत्साहानं साजरी होत आहे. अशातच वर्षभर दूध देणाऱ्या जनावरांना फुले आणि मोरपिसांनी सजवण्यात आलं. तसंच डीजेच्या तालावर त्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी फटाकेही वाजवण्यात आले. पुण्यातील गणेशपेठेत पुणे शहर आणि जिल्हा दुग्धव्यावसायिक संघाच्या वतीनं या सगर उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. (Pune Sagar Utsav)
सगर उत्सवाला 50 वर्षांची परंपरा : पुण्यातील गणेशपेठेतील सगर उत्सवात गवळी समाजाकडून पशूंना फुले आणि मोरपीसांनी सजवण्यात आलं. तसंच त्यांच्या अंगावर विविध स्टाईलची कटिंग करत, शरीरावर तसेच शिंगांवर विविध कलर लावण्यात आले. यानंतर डीजे, ढोल तसेच बँड पथक घेऊन रेड्यांची मिरवणूक काढण्यात आली. गेल्या 50 वर्षांहून अधिक काळापासून पुण्यातील गणेशपेठ येथे हा सगर उत्सव साजरा करण्यात येत आहे.
सगर उत्सव म्हणजे काय? सगर उत्सव म्हणजे गवळी समाज बांधव आपल्या जनावरांचं दिवाळी पाडव्याच्या दिवशी पूजन करतात. तसेच त्या सणाच्या दुसऱ्या दिवशी त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढतात. यात आकर्षक सजलेल्या रेड्यांच्या मालकांचा सत्कार देखील करण्यात येतो.
भाऊबीजेला जनावरांप्रति कृतज्ञता : दुग्धव्यावसायिक संघाचे अध्यक्ष विश्वास सोनवणे म्हणाले की, गेल्या 50 वर्षांहून अधिक काळापासून आमच्या इथं सगर उत्सवाचं आयोजन केलं जात आहे. हिंदू धर्मात दिवाळीला खूप महत्त्व आहे आणि या दिवाळीत भाऊबीजेला जनावरांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. ज्याचं वर्षभर आम्ही दूध विकतो आणि आमचा संसार चालतो अशा जनावरांचं ऋण फेडण्यासाठी सगर उत्सवाचं आयोजन करण्यात येत असतं. राज्यातील विविध भागात सगर उत्सव साजरा केला जातो. जवळपास 100 हून अधिक रेडे यात सहभागी होतात. यात आकर्षक पद्धतीनं सजविलेल्या रेड्यांचा आणि त्यांच्या मालकांचा सत्कारही केला जातो.
हेही वाचा: