पुणे - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरात रक्ताचा पुरवठा कमी आहे, यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'ने चार दिवसांपूर्वी बातमी केली होती. या बातमीचा परिणाम म्हणून आज (रविवारी) शहरात विविध संस्था संघटनांच्या वतीने पाच-पाच लोकांच्या ग्रुपने रक्तदान शिबीर आयोजित केले. यात 100 हून अधिक जणांनी रक्तदान केले.
शहरातील आयएसआय ब्लड बँक, आनंद ऋषीजी ब्लड बँक, केएम, सालासर, हनुमान चालीसा मंडळ यांनी वेगवेगळ्या ब्लड बँकेत जावून रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या शिबिरात 100 हून अधिक जणांनी रक्तदान केले आहे. 'ईटीव्ही भारत'ने केलेल्या बातमीची शहरातील नागरिकांनी दखल घेतली. सकाळपासूनच पाच-पाच जणांच्या ग्रुपने येऊन नागरिकांनी रक्तदान केले आहे. यावर 'ईटीव्ही भारत'चा मी खूप आभारी आहे, अशी कृतज्ञता 'रक्ताचे नाते ट्रस्ट'चे अध्यक्ष राम बांगड यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - जनतेचा जनतेसाठी 'जनता कर्फ्यू'; यवतमाळकरांची पूर्ण साथ