ETV Bharat / state

पुणे : एसटी कर्मचाऱ्यांचे अनोखे आंदोलन; रक्तदान करून आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली

author img

By

Published : Nov 21, 2021, 3:05 PM IST

Updated : Nov 21, 2021, 3:59 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्यासाठी गेल्या 14 दिवसांपासून पुण्यातील शिवाजीनगर इथेही आंदोलन सुरू आहे. (st workers strike shivajinagar pune) या आंदोलनाचा एक भाग म्हणून एसटी कर्मचाऱ्यानी कामबंद काळात सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान केलं आहे. (blood donation by st workers)

blood donation by st workers pune
एसटी कर्मचाऱ्यांचे अनोखे आंदोलन

पुणे - एसटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्यासाठी गेल्या 14 दिवसांपासून पुण्यातील शिवाजीनगर इथेही आंदोलन सुरू आहे. (st workers strike shivajinagar pune) या आंदोलनाचा एक भाग म्हणून एसटी कर्मचाऱ्यानी कामबंद काळात सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान केलं आहे. (blood donation by st workers) समाजाला आपण काही देणं लागतो, या भावनेतून हे रक्तदान आंदोलन करण्यात आलं आहे. या अनोख्या आंदोलनाद्वारे ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या (st workers suicide) केली आहे, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

एसटी कर्मचारी याबाबत बोलताना

कर्मचाऱ्यांनी आत्महत्यासारखे पाऊल उचलू नये -

एसटी कर्मचाऱ्यांनी रक्ताचे पाणी करून लोकांचा प्रवास सुखकर करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भासत असलेला रक्ताचा तुडवडा लक्षात घेता रक्तदान करण्याचा निर्णय घेतला असल्याची भावना कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवली. त्याच पद्धतीने शासनाने आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या सारखे पाऊल उचलू नये, असे आवाहन या कर्मचाऱ्यांनी केले आहे.

हेही वाचा - ST Strike : आमचे सरकार असताना तरी कुठे झाले एसटीचे विलीनीकरण? - जानकर

Last Updated : Nov 21, 2021, 3:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.