पुणे - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांना सर्व देश वंदन करतो. त्यांच्या वंशजाविरोधात संजय यांनी केलेले विधान चुकीचे आहे. त्यामुळे सर्वांची मान खाली गेली आहे. या माणसाच्या बुद्धीला काय झाले. त्यांनी केलेल्या विधानाचा निषेध करीत असल्याचे पाटील म्हणाले.
काय म्हणाले संजय राऊत, वाचण्यासाठी इथं क्लिक करा...
पवार सर्व विषय जातीवर नेतात - पाटील
राऊत आणि पवार यांचे इतिहासाचे ज्ञान मोठे आहे. आम्ही इतिहासामध्ये शिकलो की जिजामात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरू होत्या, तर रामदास स्वामी हे आध्यात्मिक गुरू होते. मात्र, पवार नेहमी जातीवर विषय घेऊन जातात, असे पाटील म्हणाले.
शरद पवार यांनी शिवाजी महाराजांची उपाधी छत्रपतीच होती, जाणता राजा नव्हे, असे वक्तव्य केले. यावरून देखील चंद्रकांत पाटलांनी पवारांवर टीका केली. संभाजी राजे यांची आम्ही राज्यसभेवर निवड केली. त्यावेळी पेशवे राजे ठरवायला लागले, असे पवार म्हणाले होते. मात्र, तुम्ही त्यांना पाडले. तुम्ही सर्व विषय जातीवर नेता, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच सत्ता यांच्या डोक्यात गेली आहे. काँग्रेस आमदाराच्या भावाने मारहाण केली. यावर राऊत यांच्या विधानावर उद्धव ठाकरे काही बोलणार आहेत का? की सत्तेसाठी गप्प बसणार आहेत? असा सवाल देखील पाटलांनी उपस्थित केला.
काय म्हणाले होते शरद पवार? वाचण्यासाठी इथं क्लिक करा...
बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक करण्याचे काम काँग्रेसला जमले नाही. त्यासाठी आमच्या सरकारने सर्व परवानग्या आणल्या होत्या. आता हे स्मारकाची उंची वाढवत आहेत. मात्र, त्याचे स्वागत आहे, असेही पाटील म्हणाले.