ETV Bharat / state

Laxman Jagtap Passed Away : आमदार लक्ष्मण जगताप अनंतात विलीन; शासकीय इतमामात पार्थिवावर अंत्यसंस्कार - Laxman Jagtap political journey

पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे ( Laxman Jagtap Passed Away ) आज मंगळवारी (3 जानेवारी) प्रदीर्घ आजाराने पुण्यातील खासगी रूग्णालयात उपचारादरम्यान वयाच्या 59 व्या वर्षी निधन (Laxman Jagtap Passed Away in Pune) झाले. लक्ष्मण जगताप यांचे पार्थिव अंत्यदर्शन घेण्यासाठी दुपारी 3 ते 6 या वेळेत त्यांच्या घरी ठेवण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी 7 वाजता पिंपळे गुरव येथे शासकीय इतमामात अंतिमसंस्कार करण्यात आले. जगताप यांच्या निधनाने शहरावर शोककळा पसरली आहे.

Laxman Jagtap Passed Away
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
author img

By

Published : Jan 3, 2023, 11:16 AM IST

Updated : Jan 3, 2023, 9:53 PM IST

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुंबई : पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे कर्करोगामुळे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जगताप हे कर्करोगाची झुंज देत होते आज अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. लक्ष्मण जगताप हे तीन टर्म पिंपरी-चिंचवडचे आमदार राहिले आहे. आज दुपारी 2 वाजेनंतर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या पिंपळे गुरवला ठेवण्यात आले होते.

मुख्यंमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली : भाजपा आमदार लक्षण जगताप हे अनंतात विलीन झाले. त्यांच्यावर पिंपरी- चिंचवड शहरातील पिंपळे गुरव भागात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शासकीय आणि राजकीय व्यक्ती उपस्थित होते. गेल्या तीन वर्षांपासून लक्ष्मण पांडुरंग जगताप हे कर्करोगाशी लढत होते. मात्र, आज पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरुवात असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जगताप यांचा राजकीय प्रवास हा थक्क करणारा आहे. नगरसेवक ते आमदार अशी राजकीय जीवन जगतापांचे राहीले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मण जगताप यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

अंत्यसंस्कारावेळी यांची उपस्थिती : यावेळी मंत्री अतुल सावे, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पी एमआर डी ए मुख कार्यकारी अधिकारी राहुल महिवाल, पोलीस आयुक्त विनयकुमर चोबे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार महेश लांडगे, अण्णा बनसोडे, नीलम गोऱ्हे, महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, खासदार श्रीनिवास पाटील आदी उपस्थित होते. दुपारी लक्षण जगताप यांचे पार्थिव त्यांच्या पिंपळे गुरव येथील चंद्ररंग निवासस्थानी आणण्यात आले होते. हजारोंच्या संख्येनं नागरिकांनी अंत्यदर्शसाठी रांग लावली. राजकीय नेते, पदाधिकारी आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. दुपारी पाचच्या सुमारास घराच्या जवळच असलेल्या शेतापर्यंत अंत्ययात्रा काढून शासकीय इतमामात लक्ष्मण जगताप यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय जमा झाला होता.

पक्षाची मोठी हानी : राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीवेळी लक्ष्मण जगताप हे भाजपासाठी तारणहार बनले होते. पिंपरी- चिंचवड ते मुंबई हा प्रवास रुग्णवाहिकेतून जगताप यांनी केला होता. त्यांच्या या लढवय्येपणाचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले होते. चिंचवड शहराच्या विकासात मोलाचे योगदान देणारे आमदार लक्ष्मणराव जगताप यांच्या निधनाने पक्षाची मोठी हानी झाल्याच्या भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. ते नागपुरात पत्रकारांसोबत बोलत होते. दीर्घ आजाराशी ते सातत्याने संघर्ष करत होते,मध्यंतरी ते बरे होतं असताना त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावं लागलं. विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी पक्षनिष्ठा सर्वतोपरी असते हे सिद्ध केलं होतं अश्या शब्दात त्यांनी आठवणींना उजाळा दिला.

कर्करोगामुळे निधन : चिंचवड विधानसभेचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा (Laxman Jagtap Passed Away ) श्वास घेतला. नगरसेवक ते भाजपा आमदार असा लक्ष्मण जगताप यांचा प्रवास असून ते भाजपाचे शहराध्यक्षदेखील होते. तीन वर्षांपूर्वी लक्ष्मण जगताप यांना कर्करोग (cancer treatment to Laxman Jagtap) झाल्याचे निदान झाले. त्यांच्यावर प्रदेशासह पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. मात्र, पुन्हा दीपावलीनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना आज त्यांचे निधन झालं. यामुळे पिंपरी- चिंचवड शहरावर शोककळा पसरली आहे.

लक्ष्मण जगताप हे 1986 साली पहिल्यांदा नगरसेवक राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपा आमदार लक्ष्मण जगताप हे मतदान करायला जाणार का? असा प्रश्न होता. तेव्हा हेच लक्ष्मण जगताप पक्षासाठी तारणहार बनले त्यांनी पिंपरी- चिंचवड ते मुंबई असा प्रवास रुग्णवाहिकेतून करत मतदानाचा हक्क बजावला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगताप यांचं कौतुक करून लढवय्ये नेते असल्याचं सांगत जगताप यांचे आभार मानले होते. लक्ष्मण जगताप हे 1986 साली पहिल्यांदा ( Laxman Jagtap political journey ) नगरसेवक झाले. 2002 पर्यंत नगरसेवक होते. महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष झाले. 2014 साली भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 पासून दोनवेळा भाजपचे आमदार झाले. 2017 साली महापालिकेत भाजपची सत्ता स्थापन करण्यात मोलाचा वाटा होता.

तडफदार नेतृत्व काळाने हिरावले- मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली - नगरसेवक, महापौर ते विधिमंडळातील तडफदार प्रतिनिधी म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवणारे नेतृत्व काळाने हिरावून नेले आहे," अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. तसेच दिवंगत जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. आमदार जगताप यांनी स्वकर्तृत्वाने कारकीर्द घडवली. पिंपरी -चिंचवडचा विकास हा त्यांचा ध्यास होता. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. विधिमंडळातही ते आपला मतदारसंघ आणि परिसरातील समस्या, अडचणी यासाठी हिरीरीने काम करत असत. लोकहिताच्या दृष्टीने अनेकदा त्यांनी संघर्षशील भूमिका घेतली. आजारपणाशीही त्यांचा प्रदीर्घ लढा सुरू होता. यातही त्यांनी आपले कर्तव्य बजावताना कुचराई केली नाही. पण नियतीला हे मान्य नसावे आणि आमदार जगताप यांना काळाने हिरावून नेले. हा त्यांच्या परिवारासह, कार्यकर्ते, चाहत्यांसाठी मोठा आघात आहे. जगताप कुटुंबियांना या आघातातून सावरण्यासाठी बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी शोकभावना व्यक्त केल्या.

भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी वाहिली श्रद्धांजली- पिंपरी चिंचवड विधानसभेचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना आज त्यांची प्राणज्योत मालवली. ते ५९ वर्षांचे होते. लक्ष्मण जगताप हे लढवय्ये नेते होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना दुर्धर आजाराने गाठलं होत. त्यातून ते सुखरूप सुटतील अस वाटत असताना पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज अखेर त्यांच उपचारादरम्यान निधन झालं.भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनावर शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.

झुंजार लोकप्रतिनिधी, जवळचा सहकारी गमावला- चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने जनतेच्या प्रश्नासाठी तळमळीने काम करणारा झुंजार लोकप्रतिनिधी, जवळचा सहकारी गमावला असल्याची दुःखद भावना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त करत त्यांना श्रध्दांजली वाहिली. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तळमळीने काम केले. राजकीय, सामाजिक जीवनात त्यांनी केलेले काम कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेचे प्रश्न विधीमंडळात मांडणारा धडाडीचा लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान होते. सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी तडफेने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीची, सहकाऱ्याची उणीव कायमच जाणवेल, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शोकसंदेशात नमूद केले आहे. तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेले काम पिंपरी-चिंचवड परिसरातील जनता कधीही विसरु शकणार नाही, अशा शब्दांत अजित पवार यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रध्दांजली वाहिली

आजारी असतानाही विधानभवनात झाले होते दाखल भाजपाचे पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप ( MLA Laxman Jagtap ) हे आजारी असून सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी 20 जून 2022 रोजी विधान भवनात पोहचले. पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल येथून ॲम्बुलन्समधून त्यांनी थेट विधान भवन ( Laxman Jagtap voting in Vidhan Bhavan ) गाठले होते. वास्तविक मागील १० तारखेला झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सुद्धा ते ॲम्बुलन्समधून विधान भवनात मतदानासाठी आले होते. 20 जूनला सकाळी साडेदहा वाजता पुण्याहून ते मतदानासाठी निघाले व दुपारी सव्वा दोन वाजता ते विधान भवनात दाखल झाले.

'पक्षावर असलेली एकनिष्ठा व त्यांची जिद्द' : विधान भवनात आल्यानंतर विरोधीपक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर गिरीश महाजन, प्रवीण दरेकर या भाजपाच्या सर्व नेत्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. मतदानाला येऊ नका, असे लक्ष्मण जगताप यांना सांगितले होते. पण तरीसुद्धा पक्षावर असलेली एकनिष्ठा व त्यांची जिद्द या कारणासाठी ते मतदानाला हजर झाले, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

Last Updated : Jan 3, 2023, 9:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.