पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाका येथे राणे कुटुंबियांच्या मोटारीचा किरकोळ अपघात झाला आहे, या मोटारीत नितेश राणे (Nitesh Rane Car Accident) यांची पत्नी, मुलं आणि नातेवाईक होते. नितेश राणे यांची पत्नी नातेवाईकांसह पुण्याच्या दिशेने येत होत्या, सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उर्से टोल नाका (Nitesh Rane Car Accident Urse Toll Plaza) येथे टोल भरण्यासाठी मोटर रांगेत होती, तेव्हा पाठीमागे असलेल्या ट्रकने राणे कुटुंबियांच्या मोटारीला किरकोळ धडक दिली, या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे. या घटनेत कोणीही जखमी नाही.
अपघातात कोणीही जखमी नाही - नितेश राणे यांच्या पत्नी मुलं, आणि नातेवाईक या गाडीतून प्रवास करत होते. नितेश राणे यांच्या पत्नी सायंकाळच्या सुमारास पुण्याच्या दिशेने येत होत्या. उर्से टोलनाका येथे गाडी टोल भरण्यासाठी रांगेत थांबली होती. तेव्हा पाठीमागून आलेल्या ट्रकने राणे कुटुंबियांच्या गाडीला धडक दिली. अपघात किरकोळ असल्याने कुणालाही कोणतीही हानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संबंधित ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.