ETV Bharat / state

लबाड सरकारची बेबंदशाही; एमपीएससी प्रकरणावरून चंद्रकांत पाटलांचा निशाणा

सरकारमध्ये बेबंदशाही सुरू असून त्यांच्यात आपापसात समन्वय नाही, सगळे घटकपक्ष वेगवेगळी भूमिका मांडत आहेत. हे सरकार लबाड आहे. त्यांच्यावर विद्यार्थ्यांनी का भरोसा ठेवावा, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसेच जिथे जिथे आंदोलन होणार तिथे भाजप जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ते पुण्यात बोलत होते.

bjp-leader-chndrakanat-patil
चंद्रकांत पाटलांचा निशाणा
author img

By

Published : Mar 12, 2021, 11:50 AM IST

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पूर्व परीक्षा रद्द केल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. तसेच विरोधी पक्ष भाजपानेही सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. सरकारमध्ये बेबंदशाही सुरू असून त्यांच्यात आपापसात समन्वय नाही, सगळे घटकपक्ष वेगवेगळी भूमिका मांडत आहेत. हे सरकार लबाड आहे. त्यांच्यावर विद्यार्थ्यांनी का भरोसा ठेवावा, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसेच जिथे जिथे आंदोलन होणार तिथे भाजप जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ते पुण्यात बोलत होते.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, जगभरात कोरोनाचे सावट अद्याप संपले नाही. अनेक आजार आले, आताही आहेत. मात्र योग्य ती काळजी घेऊन सर्व व्यवहार सुरू राहिल पाहिजेत. व्यापार बंद करा, कंपन्या बंद करा, परीक्षा रद्द करणे हे काही राज्याला परवडणारे नाही. त्यामुळे राज्यात लॉकडाऊनबाबत विचार करू नयेत.

कर्नाटत सरकार प्रमाणे परीक्षा घ्या-

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे खरे असले तरीही, परीक्षा रद्द करणे हा एकमेव पर्याय नाही. सुरक्षेबाबत योग्य ती खबरदारी घेऊन एमपीएसची परीक्षा घ्यायला हवी. कर्नाटक सरकारने यापूर्वी अशा प्रकारे कोरोना काळात नियोजन करून जवळपास ७ ते ८ लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या असल्याचेही पाटील यांनी यावेळी सूचित केले.

मॉल बंद करण्यापेक्षा त्यावर मार्ग काढायला हवा.. कोरोनाची काळजी घेण्यासंदर्भात नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे आणि प्रशासनानेही त्याची सक्ती केली पाहिजे, असेही मत चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. गर्दी करू नये यासाठी दंडात्मक कारवाई करण्यासही हरकत नसल्याचेही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. या संदर्भात पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांशी चर्चा केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.