पुणे - महिला अत्याचार आणि महाविकास आघाडी सरकारविरोधात आज(मंगळवार) भाजपच्यावतीने पिंपरी चिंचवडमध्ये आंदोलन केले. या पालिकेत भाजपचे तब्बल ९० नगरसेवक आहेत. मात्र, या आंदोलनाला बहुतांश नगरसेवक गैरहजर होते. आंदोलनातील उपस्थितांपैकी बघ्यांचीच गर्दी जास्त असल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे नगरसेवकांना याचे काहीच गांभीर्य नसल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.
पाच वर्ष सरकारमध्ये असताना आपण काय काम केले ते पाहावे म्हणजे त्यांना आंदोलन का करतोय याचा संभ्रम होईल, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपच्या या आंदोलनावर लगावला आहे.
हेही वाचा -
रुपया वधारल्यानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
'मुख्यमंत्र्यांना एकर अन् हेक्टरमधील फरक माहीत नाही; फक्त मुंबईतल्या जमिनीचे हिशेब समजतात'