ETV Bharat / state

पुण्यात सराईत गुन्हेगारांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त, ५ पिस्तुल आणि ९ काडतुसे जप्त

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांचे लक्ष आहे. अशातच मध्यप्रदेशातुन तस्करी करून आणलेला मोठा शस्त्रसाठा पुणे पोलिसांनी जप्त करुन दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे.

पुण्यात सराईत गुन्हेगारांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त, ५ पिस्तुल आणि ९ काडतुसे जप्त
author img

By

Published : Apr 15, 2019, 3:06 PM IST

पुणे - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांचे लक्ष आहे. अशातच मध्यप्रदेशातुन तस्करी करून आणलेला मोठा शस्त्रसाठा पुणे पोलिसांनी जप्त करुन दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. यामध्ये ५ पिस्तुल आणि ९ जिवंत काडतुसांचा समावेश आहे. याची एकूण किंमत तब्बल १ लाख ५१ हजार ८०० रुपये इतकी आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ माजली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार मनोज धोत्रे हा पिस्तूल विकण्यासाठी स्वारगेट परिसरातील कॅनल रोडवर येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या मनोज धोत्रे याला अटक केली. यावेळी त्याच्या ताब्यातून १ पिस्तुल आणि २ जिवंत काडतुसे जप्त केली.

Big arms seized in Pune, 5 pistols and 9 cartridges seized
पुण्यात सराईत गुन्हेगारांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त, ५ पिस्तुल आणि ९ काडतुसे जप्त

पोलिसांनी त्याला अटक करून अधिक चौकशी केली असता हे पिस्तुल त्याला सराईत गुन्हेगार मोहसीन उर्फ मोबा शेख याने दिल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मोहसीन उर्फ मोबा शेख याला वाघोलीतून अटक केली. त्याच्या झडतीत १ पिस्तूल व २ जिवंत काडतुसे मिळाली. त्यानंतर त्याने पत्र्याच्या शेडमध्ये लपवून ठेवलेले ३ गावठी पिस्तूल व ६ जिवंत काडतुसे जप्त केली. पोलिसांनी त्याला अटक करून केलेल्या अधिक चौकशीत हे पिस्तुल त्यांनी मध्यप्रदेशातून आणल्याचे सांगितले. तेव्हा पोलिसांनी मध्यप्रदेशात जाऊन पिस्तूल विक्री करणाऱ्याचा शोध घेतला. परंतु, तो सापडला नाही. दरम्यान मनोज धोत्रे याने आणखी २ गावठी पिस्तूल व ३ जिवंत काडतुसे विश्रांतवाडी येथे घरात लपवून ठेवले होते. दोघेही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. मनोज धोत्रे याच्यावर ४ गुन्हे तर मोहसीन उर्फ मोबा शेख याच्यावर ९ गुन्हे दाखल आहेत.

Intro:पुणे पोलिसांनी दोघा सराईत गुन्हेगारांना अटक करून त्यांनी मध्यप्रदेशातुन तस्करी करून आणलेला मोठा शस्त्रसाठा जप्त केला. यामध्ये 5 पिस्तुल आणि 9 जिवंत काडतुसे यांचा समावेश आहे. याची एकूण किंमत तब्बल 1 लाख 51 हजार 800 रुपये इतकी आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ माजली आहे..Body:पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांचे लक्ष आहे.. त्यातच रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार मनोज धोत्रे हा पिस्तूल विकण्यासाठी स्वारगेट परिसरातील ल कॅनल रोडवर येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या मनोज धोत्रे याला अटक केली. यावेळी त्याच्या ताब्यातून 1 पिस्तुल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त केली. Conclusion:पोलिसांनी त्याला अटक करून अधिक चौकशी केली असता हे पिस्तुल त्याला सराईत गुन्हेगार मोहसीन उर्फ मोबा शेख याने दिल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मोहसीन उर्फ मोबा शेख याला वाघोलीतून अटक केली. त्याच्या झडतीत 1 पिस्तूल व 2 जिवंत काडतुसे मिळाली. त्यानंतर त्याने पत्र्याच्या शेडमध्ये लपवून ठेवलेले 3 गावठी पिस्तूल व 6 जिवंत काडतुसे जप्त केली. पोलिसांनी त्याला अटक करून केलेल्या अधिक चौकशीत हे पिस्तुल त्यांनी मध्यप्रदेशातून आणल्याचे सांगितले. तेव्हा पोलिसांनी मध्यप्रदेशात जाऊन पिस्तूल विक्री करणाऱ्याचा शोध घेतला. परंतु तो सापडला नाही. दरम्यान मनोज धोत्रे याने आणखी २ गावठी पिस्तूल व ३ जिवंत काडतुसे विश्रांतवाडी येथे घरात लपवून ठेवले होते. दोघेही आरोपी सराईत गुन्हेगार असून मनोज धोत्रे याच्यावर 4 गुन्हे तर मोहसीन उर्फ मोबा शेख याच्यावर 9 गुन्हे दाखल आहेत..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.