ETV Bharat / state

बारामतीत राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई, ६२ लाखांचा मुद्देमाल जप्त - बारामतीमध्ये अतिशुद्ध मद्यार्क जप्त बातमी

बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी येथील रंगीला राजस्थान ढाब्याच्या आवारात टँकर लावून वाहनचालक आरोपी सुखनाम सिंग हा टँकरमधील अतिशुद्ध मद्यार्क चोरून ढाबा चालक भार्गव यास विक्री करणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार छापा टाकून भरारी पथकाने १६ चाकी टँकर सह सुमारे ४० हजार लिटर अतिशुद्ध मद्यार्क (स्पिरिट) प्लॅस्टिक कॅन, पाईप असा एकूण तब्बल ६२ लाख ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बारामतीत राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई

author img

By

Published : Jul 6, 2020, 9:16 PM IST

Updated : Jul 6, 2020, 9:32 PM IST

जप्त
जप्त करण्यात आलेल्या ट्रकसह आरोपींना अटक

पुणे : जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी येथे राज्य उत्पादन शुल्क पथकाने छापा टाकून तब्बल ६२ लाख ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सुख नाम दिलज्योत सिंग (वय.५६ रा. कोटदाना, ता. तरन तारन, जि. तरन तारन), पुखराज टीकमजी भार्गव (रा कोठडी, ता. दिसोरी. जि,पाली, राजस्थान, सध्या राहणार कुतवळ वस्ती, ता. बारामती) या आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक २ पुणेचे निरीक्षक यांना बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी येथील रंगीला राजस्थान ढाब्याच्या आवारात टँकर लावून वाहनचालक आरोपी सुखनाम सिंग हा टँकरमधील अतिशुद्ध मद्यार्क चोरून ढाबा चालक भार्गव यास विक्री करणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सदर ठिकाणी छापा टाकून भरारी पथकाने १६ चाकी टँकर क्र. (एम.पी ०९ एच.जे ०२७७ ) सह सुमारे ४० हजार लिटर अतिशुद्ध मद्यार्क (स्पिरिट) प्लॅस्टिक कॅन, पाईप असा एकूण तब्बल ६२ लाख ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

टाळेबंदीच्या काळातील भरारी पथकाकडून केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. सदरची कारवाई प्रसाद सुर्वे, विभागीय भरारी उप-आयुक्त, संतोष झगडे अधीक्षक, संजय जाधव, संजय पाटील उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल बिराजदार निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन पुणे, विजय मनाळे निरीक्षक दौंड विभाग, विकास थोरात दुय्यम निरीक्षक, सतीश इंगळे, प्रशांत दांहिजे, सर्वश्री पडवळ, बी.आर.सावंत, विजय विंचुरकर, अशोक पाटील, मनिषा भोसले, केशव वामणे, अभिजीत रिसोलेकर यांनी केली.

Last Updated : Jul 6, 2020, 9:32 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.