ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांना घालणार दारूच्या बाटल्यांचा हार; तृप्ती देसाई - trupti desai

राज्य सरकारने तातडीने महाराष्ट्रात दारूबंदी करावी. भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात पहिल्या पाच मुद्द्यांपैकी "दारूमुक्त महाराष्ट्र" हा मुद्दा घेवून त्याची अंमलबजावणी करावी. अन्यथा हडपसर येथे महाजनादेश यात्रेचे स्वागत भूमाता ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्र्यांना दारूच्या बाटल्यांचा हार घालून आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांना दारूच्या बाटल्या देऊन करण्यात येणार असल्याचा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला आहे.

तृप्ती देसाई अध्यक्षा भूमाता ब्रिगेड
author img

By

Published : Sep 13, 2019, 6:18 PM IST

पुणे - राज्यात दारूबंदी करत नसल्याने मुख्यमंत्र्यांना महाजनादेश यात्रेत दारूच्या बाटल्यांचा हार घालण्याचा इशारा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिला आहे. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी पुण्यात येत आहेत. पुण्यातल्या हडपसर येथे सायंकाळी मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा दाखल होणार असून शहराच्या विविध भागात ही महाजनादेश यात्रा जाणार आहे.

तृप्ती देसाई अध्यक्षा भूमाता ब्रिगेड

हे ही वाचा - ठरलं..! उदयनराजेंच्या हाती 'कमळ', मोदींच्या उपस्थितीत दिल्लीत उद्या भाजपप्रवेश

राज्यामध्ये अनेक ठिकाणी महिला दारूबंदीसाठी अनेक मोर्चे काढत आहेत. अनेक महिलांचे संसार या दारूमुळे उध्वस्त होत आहेत. दारूमुळे गुन्हेगारी वाढत आहे. असे असून सुध्दा राज्य सरकार महाराष्ट्रात दारूबंदीसाठी कोणतेही पाऊल उचलायला तयार नाही. असा आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केला आहे. "दारूची बाटली म्हणजे मृत्यूची बातमी" अशी जाहिरात अनेक ठिकाणी पाहायला मिळते परंतु हीच दारूची बाटली राज्य सरकारच्या परवानगीनेच मिळते. राज्य सरकारने तातडीने महाराष्ट्रात दारूबंदी करावी. भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात पहिल्या पाच मुद्द्यांपैकी "दारूमुक्त महाराष्ट्र" हा मुद्दा घेवून त्याची अंमलबजावणी करावी. अन्यथा हडपसर येथे महाजनादेश यात्रेचे स्वागत भूमाता ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्र्यांना दारूच्या बाटल्यांचा हार घालून आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांना दारूच्या बाटल्या देऊन करण्यात येणार असल्याचा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने राज्यभर फिरत आहेत.

हे ही वाचा - कोकणात राष्ट्रवादीला धक्का, भास्कर जाधवांनी 'घड्याळ' काढत बांधले 'शिवबंधन'

Intro:राज्यात दारूबंदी करत नसल्याने मुख्यमंत्र्यांना महाजनादेश यात्रेत दारूच्या बाटल्यांचा हार घालणार, तृप्ती देसाईBody:mh_pun_03_tripti_desai_cm_ishara_avb_7201348

anchor
महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी सायंकाळी पुण्यात येता आहेत...पुण्यातल्या हडपसर येथे सायंकाळी मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा दाखल होत असून पुणे शहराच्या विविध भागात ही जनादेश यात्रा जाणार आहे मात्र या यात्रेवेळी मुख्यमंत्र्यांचे दारूच्या बाटल्याचा हार घालून स्वागत करू असा इशारा महिलांच्या प्रश्नावर लढणाऱ्या कार्यकर्त्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिला आहे.. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे सध्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने जनतेशी संवाद आणि त्यांच्या मागण्यांसंदर्भात राज्य भरात कानोसा घेत आहेत परंतु राज्यामध्ये अनेक ठिकाणी महिला दारूबंदीसाठी अनेक मोर्चे काढत आहेत ,अनेक महिलांचे संसार या दारूमुळे उध्वस्त होत आहेत, गुन्हेगारी वाढत आहे ,युवकांचे नुकसान आणि प्राण जात आहेत तरीसुद्धा राज्य सरकार "महाराष्ट्रात दारूबंदी" करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलायला तयार नाही. असा आरोप तृप्ती देसाई यांनी केला आहे....राज्य सरकारची "दारूची बाटली म्हणजे मृत्यूची बातमी "अशी जाहिरात अनेक ठिकाणी पाहायला मिळते परंतु हीच दारूची बाटली राज्य सरकारच्या परवानगीनेच सर्वांना देण्यात येते. तातडीने महाराष्ट्रात दारूबंदी करावी.भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात पहिल्या पाच मुद्द्यांपैकी "दारूमुक्त महाराष्ट्र"हा मुद्दा घ्यावा आणि त्याची अंमलबजावणी करावी ,यासाठी हडपसर येथे महाजनादेश यात्रेचे स्वागत भूमाता ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्र्यांना दारूच्या बाटल्यांचा हार घालून तसेच त्यांच्या बरोबरील इतर मंत्र्यांना दारूच्या बाटल्या हातात घेऊन करण्यात येणार असल्याचा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला आहे...
Byte तृप्ती देसाई, भूमाता ब्रिगेडConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.