पुणे - भीमाशंकर अभयारण्य हे वन आणि वन्यजीव संपदा संवर्धनाच्या दृष्टीने राखीव ठेवण्यात आले आहे. या अभयारण्यासाठी पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील 42 गावांच्या एकूण 101.62 चौरस किमी क्षेत्रावर केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व जलवायू मंत्रालयाने इको सेन्सेटिव्ह झोन जाहीर केला आहे. मात्र या इको सेन्सिटिव्ह झोन मुळे आदिवासी नागरिकांच्या हक्कांवर गदा येणार म्हणून या झोनला विरोध करण्यात येत आहे. यावर वनविभागाने इको सेन्सिटिव्ह झोनबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी एकसुत्री कार्यक्रम हाती घेतला आहे. यामाध्यमातून आदिवासी नागरिकांचा होत असेलला विरोध दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे उपवनसंरक्षक जयरामे गौडा यांनी सांगितले.
भीमाशंकर अभयारण्य इको सेन्सिटिव्ह झोन; नागरिकांच्या गैरसमजुती दूर करणार वनविभाग - इको सेन्सेटिव्ह झोन
भीमाशंकर अभयारण्य जंगली प्राणी, निसर्ग टिकवून रहाण्यासाठी भीमाशंकर अभयारण्य इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. मात्र या इको सेन्सिटिव्ह झोन मुळे आदिवासी नागरिकांच्या हक्कांवर गदा येणार म्हणुन या झोनला विरोध करण्यात येत आहे. यावर वनविभागाने इको सेन्सिटिव्ह झोनबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी एकसुत्री कार्यक्रम हाती घेतला आहे.