ETV Bharat / state

सिगारेटचे पैसे मागितल्याच्या कारणावरून भावंडांना मारहाण; तिघांना अटक - Pune crime news

पानटपरी चालवणाऱ्या भावंडांना सिगारेटचे पैसे मागितल्याच्या कारणावरून त्रिकुटाने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

वाकड पोलीस ठाणे
author img

By

Published : Nov 10, 2019, 11:05 PM IST

पुणे - पानटपरी चालवणाऱ्या भावंडांना सिगारेटचे पैसे मागितल्याच्या कारणावरून त्रिकुटाने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित घटना वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत काळेवाडी येथे घडली. या प्रकरणी वाकड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

हेही वाचा - 39 व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेचे पुण्यात आयोजन

रोहित ऊर्फ डोंग्या प्रभाकर वाघमारे (वय- 19), अजिंक्‍य ऊर्फ पवन श्‍याम देशमुख (वय -21), विकी राजू पठारे (वय- 21) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर निजाम असरफअली खान (वय - 20 रा. काळेवाडी) यांनी आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

हेही वाचा - विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निजाम यांची काळेवाडी येथे एका हॉटेल समोर पानटपरी आहे. त्या टपरीवर आरोपी रोहित, अजिंक्य आणि विकी यांनी सिगारेट घेतली आणि पैसे न देताच निघून जात होते. तेव्हा, निजाम यांनी त्यांच्याकडे पैश्यांची मागणी केली. पैसे मागितल्याच्या कारणावरून निजाम आणि त्यांचा भाऊ रईस खान या दोन भावंडाना आरोपींनी दगडाने बेदम मारहाण केली. या घटनेत दोन्ही भाऊ जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

Intro:mh_pun_03_Marhan_av_mhc10002Body:mh_pun_03_Marhan_av_mhc10002

Anchor:- टपरी चालवणाऱ्या दोन भावानी सिगारेट चे पैसे मागितल्याच्या कारणावरून बेदम मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित घटना वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत काळेवाडी येथे घडली आहे. या घटने प्रकरणी वाकड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

निजाम असरफअली खान वय-२० रा. काळेवाडी यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. रोहित ऊर्फ डोंग्या प्रभाकर वाघमारे वय-१९, अजिंक्‍य ऊर्फ पवन श्‍याम देशमुख वय-२१, विकी राजू पठारे वय-२१ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निजाम यांची काळेवाडी येथे एका हॉटेल समोर पान टपरी आहे. त्या टपरी वर आरोपी रोहित, अजिंक्य आणि विकी यांनी सिगारेट घेतली आणि पैसे न देताच निघून जात होते. तेव्हा, फिर्यादी निजाम यांनी त्यांच्याकडे पैश्यांची मागणी केली. पैसे मागितल्याच्या कारणावरून निजाम आणि त्यांचा भाऊ रईस खान या दोन भावंडाना आरोपींनी दगडाने बेदम मारहाण करण्यात आली. या घटने दोन्ही भाऊ जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. घटने प्रकरणी आरोपी ला अटक करण्यात आली आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.