ETV Bharat / state

आळंदीत ग्राहकांचा रुबाब; 100 रुपयांमध्ये सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी! - Alandi marathi news

आळंदीत सध्या सोन्याच्या वस्तऱ्याची जोरदार चर्चा असून सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी करण्यासाठी ग्राहकांनी रुबाब सलूनमध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.

Beard with a gold razor for Rs 100 in Alandi
आळंदीत 100 रुपयांमध्ये सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी!
author img

By

Published : Feb 25, 2021, 3:44 PM IST

पुणे - आळंदीत सध्या सोन्याच्या वस्तऱ्याची जोरदार चर्चा असून सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी करण्यासाठी ग्राहकांनी रुबाब सलूनमध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. अविनाश बोरूदिया यांनी दोन तरुणांना सोबत घेऊन रुबाब नावाचे सलून आळंदीत सुरू केले असून त्याला प्रचंड प्रतिसाद ग्राहकांकडून मिळत आहे.

आळंदीत 100 रुपयांमध्ये सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी!
तरुणांना सोबत घेऊन लढवली शक्कल-
आळंदीत सोन्याच्या वस्तऱ्याची चर्चा असून अविनाश बोरुदिया या व्यवसायिकाने विक्की वाघमारे आणि युवराज कोळेकर यांना सोबत घेऊन रुबाब नावाचे सलून सुरू करण्याचे ठरविले. त्यानुसार, दुकानाच्या नावाप्रमाणेच काहीतरी वेगळे सलूनमध्ये करण्याचं ठरलं.
Beard with a gold razor for Rs 100 in Alandi
आळंदीत 100 रुपयांमध्ये सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी!
सोन्याचा वस्तरा तयार करण्यासाठी राजस्थानमधील कारागीर-
भारतीय संस्कृतीत सोन्याच्या धातूला महत्व असून सोन्याच्या धातूपासून वस्तरा करण्याचे निश्चित झालं. अस अविनाश यांनी सांगितलं. त्यांनी राजस्थान येथील विशेष कारागिरांकडून 4 लाख रुपये खर्च करून 8 तोळे सोन्याचा वस्तरा बनवून घेतला.
100 रुपयांमध्ये सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी!-
रुबाब सलूनचे धडाक्यात उद्घाटन करण्यात आले आणि सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी करण्यास सुरुवात केली. ते देखील सर्व सामान्य नागरिकांना परवडेल या दरात. सध्या या वस्तऱ्याची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा रंगली असून शंभर रुपयांना सोन्याचा वस्तऱ्याने दाढी केली जात आहे. त्याला ग्राहकांचा प्रतिसाद मिळत असून समाधान व्यक्त केलं आहे. त्यामुळे सलूनच्या नावाप्रमाणेच सध्या ग्राहकांचा रुबाब पाहायला मिळत आहे.

हेही वाचा- पंतप्रधान मोदी मला सरदार पटेलांपेक्षा मोठे वाटू लागलेत - संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.