ETV Bharat / state

बारामतीत रंगणार क्रिकेटचे सामने; राज्यस्तरीयसह रणजी सामन्यांसाठी बीसीसीआयचा हिरवा कंदिल - शरद पवार

राजकीय घडामोडीसाठी चर्चेत असणाऱ्या बारामती शहरात आता क्रिकेट सामने रंगणार आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात उभारलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर बीसीसीआयने राज्यस्तरीय व रणजी सामने खेळवण्यासाठी मान्यता दिली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, बारामती
author img

By

Published : Sep 10, 2019, 10:38 AM IST

Updated : Sep 10, 2019, 11:43 AM IST

पुणे - बारामतीमध्ये बीसीसीआयने राज्यस्तरीय व रणजी सामने खेळवण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच बारामतीच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर क्रिकेटचे सामने रंगताना दिसणार आहेत.

बारामतीमध्ये बीसीसीआयने राज्यस्तरीय व रणजी सामने खेळवण्यासाठी मान्यता दिली आहे

बारामती शहरातील मध्यवर्ती भागात १९८५ मध्ये भव्य स्टेडियम उभारण्यास सुरुवात झाली होती. निधी अभावी तब्बल ३० वर्षे हे काम रखडले होते. मात्र, २०१५ मध्ये शरद पवारांनी लक्ष घातल्याने स्टेडियमचे काम वेगात पूर्ण झाले.

हेही वाचा - पाकिस्तानमध्ये क्रिकेट मालिका?.. 'नको रे बाबा'

बीसीसीआयचे निरीक्षक प्रकाश आढाव यांनी बारामतीच्या मैदानाला भेट दिली. हे मैदान प्रथम श्रेणी व रणजी सामन्यांसाठी उत्तम असल्याचा अभिप्राय दिला. त्यामुळे बारामतीमध्ये क्रिकेट सामने खेळण्याचा मार्ग मोकळा झाला, असल्याची माहिती महाराष्ट्र रणजी निवड समितीचे अध्यक्ष मिलिंद गुंजाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव रियाज बागवान, माजी अध्यक्ष अजय शिर्के, नगरसेवक किरण गुजर, बिरजू मांढरे हे उपस्थित होते.

हेही वाचा - 'या' कारणासाठी थांबवला मुख्यमंत्र्यांचा ताफा; पुण्यातील घटना

बारामतीत पहिला रणजी सामना महाराष्ट्र विरुध्द उत्तराखंड या संघात १२ ते १५ फेब्रुवारी २०२० या दरम्यान खेळवला जाणार आहे. या अगोदर १७ ऑक्टोबर २०१९ रोजी महाराष्ट्र विरुध्द सौराष्ट्र हा तीन दिवसांचा विजय मर्चंट ट्रॉफीसाठीचा पहिला सामना बारामतीत खेळवला जाणार आहे. बारामतीत होणारा प्रथम श्रेणी क्रिकेटचा हा पहिलाच सामना असेल.
दरम्यान, १३ सप्टेंबरपासूनच निवड चाचणी संघाचे सामने सुरु होणार आहेत. यामध्ये केदार जाधव, राहुल त्रिपाठी, अंकीत बावणे या सारखे महाराष्ट्रातील नामवंत खेळाडू बारामतीच्या मैदानावर खेळणार आहेत. हे सर्व सामने क्रिकेट रसिकांना विनामूल्य पाहता येणार आहेत.

Intro:बारामती आता क्रिकेटच्या नकाशावर, बारामतीत होणार रणजी सामनेBody:mh_pun_01_baramati_cricekt_av_7201348

anchor
बारामतीत आता क्रिकेटच्या नकाशावर येणार आहे बारामतीत आता रणजी
बीसीसीआयचे राज्यस्तरीय
सामने खेळविण्याची मान्यता देण्यात आलीय, बारामती मधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयमवर राज्यस्तरीय व रणजी सामने खेळविण्याची बीसीसीआयने नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे बारामतीच्या क्रिकेटपटूची ३४ वर्षाची प्रतीक्षा संपली आहे. बारामती शहरातील मध्यवर्ती भागात १९८५ मध्ये भव्य स्टेडियम उभारण्यास सुरुवात झाली होती. निधीअभावी तब्बल ३० वर्षे काम उपेक्षित होते. मात्र २०१५ मध्ये शरद पवारांनी लक्ष घातल्याने स्टेडियमची कामे अधिक चांगल्या गतीने पूर्ण झाली.
बीसीसीआयचे निरीक्षक प्रकाश आढाव यांनी बारामतीच्या मैदानाला भेट देऊन हे मैदान प्रथम श्रेणी व रणजी सामन्यांसाठी उत्तम असल्याचा अभिप्राय दिल्यानंतर बारामतीत सामने खेळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती महाराष्ट्र रणजी निवड समितीचे अध्यक्ष मिलिंद गुंजाळ, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव रियाज बागवान यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष अजय शिर्के, नगरसेवक किरण गुजर, बिरजू मांढरे उपस्थित होते.
बारामतीत पहिला रणजी सामना महाराष्ट्र विरुध्द उत्तराखंड असा १२ ते १५ फेब्रुवारी २०२० या दरम्यान खेळवला जाणार आहे. दरम्यान १७ ऑक्टोबर २०१९ रोजी महाराष्ट्र विरुध्द सौराष्ट्र हा तीन दिवसांचा विजय मर्चंट ट्रॉफीसाठीचा पहिला सामना बारामतीत खेळवला जाणार आहे. बारामतीत होणारा प्रथम श्रेणी क्रिकेटचा हा पहिलाच सामना असेल. १८ ते २१ जानेवारी २०२० या काळात महाराष्ट्र विरुध्द मुंबई हा चार दिवसांचा कुचबिहार ट्रॉफीचा सामना होणार आहे. तर १३ सप्टेंबरपासूनच निवड चाचणी संघाचे सामने सुरु होणार आहेत. यामध्ये केदार जाधव, राहुल त्रिपाठी, अंकीत बावणे या सारखे महाराष्ट्रातील नामवंत खेळाडू बारामतीच्या मैदानावर खेळणार आहे. हे सर्व सामने क्रिकेट रसिकांना विनामूल्य पाहता येणार आहे. महाराष्ट्राचे माजी कर्णधार धीरज जाधव यांच्या प्रयत्नातूनच राज्यस्तरीय व रणजी सामने होत आहे अशी माहिती मिलिंद गुंजाळ यांनी दिली आहे.
Conclusion:
Last Updated : Sep 10, 2019, 11:43 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.