पुणे : राज्यात महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षाच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री पदासाठी दावेदारी केली जात आहे. तिन्ही पक्षांच्या नेते मंडळींचे फोटो, फ्लेक्स देखील लावण्यात येत आहे. यावरुन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. महाविकास आघाडीमध्ये 10 मुख्यमंत्री आहेत. त्यापैकी काँग्रेसकडे 3 मुख्यमंत्री आहेत. नाना पटोले यांनी तर वारीत फ्लेक्स लावले होते, असे म्हणत बावनकुळेंनी नाना पटोले यांनाही टोमणा मारला.
पुढील अजून 2 मुख्यमंत्री येणार : पांडुरंगाकडे राज्यासाठी शेतकऱ्यांसाठी मागावे लागते. मी देखील शेतकऱ्यांसाठी तसेच कालच पांडुरंगाच्या चरणी पाऊस होऊ दे ही इच्छा व्यक्त केली आणि पांडुरंगाने ती लगेच मान्य केली. तर काही मुख्यमंत्री होण्यासाठी जातात. काँग्रेसकडे 3 मुख्यमंत्री, तर राष्ट्रवादीत 3 मुख्यमंत्री आणि शिवसेनेत 2 असे आठ तर झाले आहे. येत्या काळात अजून 2 जण पुढे येणार आहेत. त्यामुळे 10 मुख्यमंत्र्याचा हा पक्ष आहे, अशी टीका यावेळी बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारला 9 वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोदी @9 हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमअंतर्गत माजी खासदार संजय काकडे यांच्यावतीने 60 हजार पुस्तके वाटण्यात येणार आहेत. ज्यात 9 वर्षात केलेल्या विकासकामांची माहिती आहे. याचे प्रकाशन आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्रीपद नाही मागत : गेल्या काही दिवसांपासून नेत्यांचे समर्थक आप-आपल्या नेत्यांचे पोस्टर भावी मुख्यमंत्री म्हणून लावत असतात. यात अजित पवार, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे, नाना पटोले, यांचे पोस्टर भाव मुख्यमंत्री म्हणून ठिक-ठिकाणी झळकले आहेत. अलीकडे नाना पटोले यांचे एक पोस्टर आषाढी वारीदरम्यान झळकले होते. त्यावरुन चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.
वारीत मुख्यमंत्रीपदाचे लागलेल्या फ्लेक्सवर बावनकुळे म्हणाले की, आम्ही मुख्यमंत्री पदासाठी नाही तर राज्यात समृध्दी यावी. तसेच महाराष्ट्र क्रमांक 1 वर यावे. राज्यात पाऊस पडू दे ही इच्छा व्यक्त करायला आम्ही पांडुरंगाच्या चरणी गेलो होतो. ती इच्छा लगेच पूर्ण झाली -चंद्रशेखर बावनकुळे
पंतप्रधान पदाचे दावेदार अनेक : पाटणा येथे झालेल्या बैठकीवरूनही बावनकुळे यांनी विरोधकांवर टीका केली. भाजपला 150 जागा आणि विरोधकला 300 जागा मिळतील अशी चर्चा झाली आहे. यावर बावनकुळे म्हणाले की याच्या उलट होणार आहे. विरोधकांना 150 जागा मिळणार आहेत. तर एनडीए मोदी सरकारला 350 जागा मिळतील. तसेच आत्ता जे विरोधक एकत्र आले आहेत. 2019 मध्ये असेच एकत्र आले होते. पण नंतर काय झाले. आत्तादेखील 19 दल एकत्र आले पण त्यांचे विचार एकत्र नाही. ते देखील 19 चे 19 पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत, असंदेखील यावेळी बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा -