ETV Bharat / state

बारामतीची प्रज्ञा काटे कोरोना रुग्णांचा ठरतेय आधारवड..! - बारामतीची प्रज्ञा काटे कोरोना रुग्णांना मदत

जगभर कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात आहे. पुण्यासह बारामतीतही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या रुग्णांना खाट, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, प्लाज्मा मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा प्रयास करावा लागत आहे. अशावेळी बारामतीतील प्रज्ञा काटे ही तरुणी रुग्ण व नातेवाईकांसाठी आधार ठरत आहे. याबाबत ईटीव्ही भारतने घेतलेला हा विशेष आढावा...

बारामती
बारामती
author img

By

Published : Apr 28, 2021, 4:45 PM IST

बारामती (पुणे) - माळेगाव येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी व राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका प्रज्ञा काटे ही तरुणी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने कोविडच्या संकट काळात रुग्ण व नातेवाईकांना आधार देण्याचे काम करत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांना ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटर, प्लाज्मा, मिळवण्यासाठी नातेवाईकांची होत असलेली धावपळ पाहून प्रज्ञा त्यांच्या मदतीला धावून जात आहे. कोरोनाबाधित रुग्णांना मानसिक आधार देणे त्या रुग्णांच्या नातेवाइकांना धीर देणे मदतीसाठी संपर्क केलेला कोणताही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही, यासाठी ती कार्य करत आहे. यासाठी तिला परिसरातील डॉक्टर, वकील तसेच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे सवंगडी सहकार्य करीत आहेत.

बारामती

दीड वर्षांपासून प्लाजमादानासाठी कार्य..

महाराष्ट्रात कोरोना दाखल झाल्यापासून म्हणजेच मागील दीड वर्षापासून दीड हजार पेक्षा जास्त रुग्णांना प्लाज्मा मिळून उपलब्ध करून देण्यात आला आहे. या शिवाय अनेक रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मिळवून देण्यासाठी ही प्रज्ञा कार्यरत आहे. यासाठी मराठा सहकार्य समूह, वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन, युवा चेतना ग्रुप राज्यभर रुग्णांच्या सेवेसाठी कार्य करत असल्याचे प्रज्ञा सांगते.

...म्हणून वैद्यकीय सेवमध्ये

माझ्या काकांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांना बेड उपलब्ध झाला नाही. तसेच आवश्यक औषधे व इंजेक्शन मिळू न शकल्याने ते दगावले. हे सर्व जवळून पाहिले आणि तेव्हाच ठरवले की, कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेसाठी काम करावे. रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना येणाऱ्या अडचणी दूर करून त्यांना मानसिक आधार देण्याचे काम सध्या मी आणि माझ्या पथकाकडून सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.