ETV Bharat / state

बारामती पोलिसांची गावठी दारू अड्ड्यावर कारवाई; 80 हजारांचा मुद्देमाल जप्त - बारामती पोलीस कारवाई

बारामती गुन्हे शाखेने व शहर पोलिसांनी अचानक छापा टाकत हातभट्टी तयार करण्यासाठी वापरले जाणाऱ्या रसायनाचे १२ बॅरल आणि इतर साहित्य असा ८० हजार रुपयांचा माल नष्ट केला. या कारवाईत अलका पवार, किशोर वाघमारे, (दोघे. रा. पिंपळी, ता. बारामती) यांच्यावर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

baramati crime
बारामती पोलिसांची गावठी दारू अड्ड्यावर कारवाई; 80 हजारांचा मुद्देमाल जप्त
author img

By

Published : Jun 5, 2020, 8:36 AM IST

बारामती (पुणे) - बारामतीतील पिपळी येथे बेकायदेशीर गावठी हातभट्टी अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी ८० हजार रुपये किंमतीचे दारू निर्मितीचे साहित्य नष्ट केले. या कारवाईत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती गुन्हे शाखेने व शहर पोलिसांनी अचानक छापा टाकत हातभट्टी तयार करण्याचे रसायनाचे १२ बॅरल आणि इतर साहित्य असा ८० हजार रुपयांचा माल नष्ट केला. या कारवाईत अलका पवार, किशोर वाघमारे, (दोघे. रा. पिंपळी, ता. बारामती) यांच्यावर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारामती पोलिसांची गावठी दारू अड्ड्यावर कारवाई; 80 हजारांचा मुद्देमाल जप्त
अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरून त्यांनी बारामती गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना संबंधीत ठिकाणी छापा टाकण्यास सांगितले. त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले, पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे तसेच बारामती शहर पोलीस ठाण्यातील पोलीस जवान सिद्धू पाटील, डोईफोडे आणि आरसीपी पथकातील ४ पोलीस जवान यांनी कारवाई केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.