ETV Bharat / state

बारामतीत विदेशी बनावटीची दारू जप्त; कारमधून सुरू होती तस्करी - liquor seized in baramati

बारामतीमध्ये अवैधरित्या विदेशी दारूची तस्करी आणि विक्री करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी कारसह १६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बारमतीत विदेशी बनावटीची दारू जप्त
बारमतीत विदेशी बनावटीची दारू जप्त
author img

By

Published : Dec 13, 2020, 2:02 PM IST

बारामती- शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी इंदापूर चौकात कारमध्ये विदेशी दारू वाहतूक व विक्री करणाऱ्याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून १६ लाख रुपये किमतीच्या कारसह ७८ हजार रुपयांची विदेशी दारू पोलिसांनी जप्त केली आहे. राहुल पोपट शिरसट( वय ३५ वर्षे रा.वंजारवाडी ता.बारामती) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

शहरातच करत होता विक्री-

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल शिरसट हा इनोव्हा क्रिस्टा( एम.एच१४ एफ.एम ३२३३) या आलिशान कारमध्ये शहरातील इंदापूर चौक, गणेश मार्केट येथे विदेशी दारूचा साठा जवळ बाळगून त्याची वाहतूक व विक्री करत असताना पोलिसांना आढळून आला. शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कारसह एकूण १६ लाख ७८ हजार १३८ रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. या प्रकरणी आरोपीवर शहर पोलीस ठाण्यात पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक जाधव करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.