बारामती (पुणे) - माळेगाव येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी ९ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ३३ जणांवर तालुका पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून (रमाबाई नगर माळेगाव ता. बारामती ) येथे रमन गायकवाड व इतर एका बंगल्यात बेकायदा पत्त्याचा क्लब चालवुन पैशावर जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आली.
जुगार अड्ड्यावर छापा टाकून रोख रक्कम ७ दुचाकी, १ चार चाकी व इतर जुगाराचे साहित्य असा एकूण ९ लाख ७० हजार ४० रुपयांचा मुद्देमाल व जुगार खेळणाऱ्या ३३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप गोसावी, पोलीस हवालदार सुरेश भोई, रमेश केकाण, आप्पा दराडे, वैभव साळवे, गणेश काटकर, राहूल लाळगे, दत्तात्रय गवळी तसेच आर.सी.पी. पथक क्रमांक ३ मधील श्रीकांत गोसावी, रज्जाक मणेरी, आबा जाधव, सचिन दरेकर, अमोल चितकुटे, सागर कोरडे, सुजीत शिंदे, प्रियंका झणझणे, मेघा इंगळे, मंगल बनसोडे यांनी कारवाई केली.