ETV Bharat / state

बारामती: दिवसभरात केवळ 25 वाहनांनाच मिळते योग्यता प्रमाणपत्र, कोठा वाढवण्याची मागणी

बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रतिदिन केवळ पंचवीसच लहान-मोठ्या वाहनांना योग्यता प्रमाणपत्र दिले जात आहे. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत असून, बारामती, इंदापूर, दौंड तालुक्यातून येणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेता वाहन तपासणीचा कोठा वाढवण्याची मागणी वाहन मालकांकडून होत आहे.

दिवसभरात केवळ 25 वाहनांनाच मिळते योग्यता प्रमाणपत्र

author img

By

Published : Apr 2, 2021, 6:39 PM IST

बारामती - बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रतिदिन केवळ पंचवीसच लहान-मोठ्या वाहनांना योग्यता प्रमाणपत्र दिले जात आहे. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत असून, बारामती, इंदापूर, दौंड तालुक्यातून येणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेता वाहन तपासणीचा कोठा वाढवण्याची मागणी वाहन मालकांकडून होत आहे.

बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सध्या वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्रांची तपासणी करण्याची ऑनलाईन अपॉइंटमेंट ३० दिवसांच्या नंतरची मिळत आहे. शिवाय ऑनलाइन अपॉइंटमेंट सकाळी ८ वाजता सुरू होऊन ८ वाजून २ मिनिटांमध्ये १ दिवसाचा कोठा म्हणजेच २५ वाहन तपासणीचा कोठा संपत आहे. अवघ्या दोनच मिनिटात कोठा संपत असल्याने वाहन तपासणीचा कोठा वाढवण्याची मागणी वाहन मालकांकडून केली जात आहे. बारामती, दौंड, इंदापूर या तीन तालुक्यांसाठी २५ अपॉइंटमेंट असतात. त्यामध्ये तीन चाकी, प्रवासी रिक्षा, हलकी व मध्यम वाहने, टँकर व जड वाहने अशा प्रकारच्या सर्व वाहनांसाठी वेगवेगळा कोठा आहे. या सर्वांमधून ऑनलाईन अपॉईंटमेंट मिळणे मुश्कील असून, वाहन मालकांची शेकडो वाहने दोन-दोन महिने एकाच जागेवर उभी आहेत. त्यामुळे वाहन मालकांचे फार मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

अपॉइंटमेंट मिळत नसल्याने वाहनचालक त्रस्त

वाहने पासींग करताना स्पीड गव्हर्नर, फास्टॅग, झेब्रा रेडियम, ब्रेकटेस्टवर वाहन घेऊन गेले की तेथे गाडी सॅनिटायझर करून घेणे बंधनकारक आहे. एवढा खर्च करूनही वाहनांची योग्यता प्रमाणपत्रांची तपासणी करण्यासाठी दोन दोन महिने ऑनलाईन अपॉइंटमेंट मिळत नसल्याचे चित्र बारामती परिवहन कार्यालयात दिसून येत आहे. वाहनांची योग्यता प्रमाणपत्र तपासण्याची ऑनलाईन अपॉइंटमेंट मिळत नसल्यामुळे वाहन मालकांची आर्थिक कोंडी होत आहे. वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राची तपासणी करण्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट मिळाव्यात अशी मागणी वाहन मालकांकडून केली जात आहे. सुटीच्या दिवशी शनिवार व रविवार रोजी वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राची तपासणी करण्याबाबत बारामतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांच्याशी चर्चा करून योग्य ते निर्णय घेऊ, अशी माहिती पुण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.