पुणे - समाजातील गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी विविध व्यक्ती संघटना विविध उपक्रम राबवत असतात. समाजातील गरजूंसाठी खारीचा वाटा म्हणून राज्यभरात सुरू झालेला एक नाविन्यपूर्ण उपक्रम बारामतीतही राबविण्यात येत आहे. ‘माणुसकीची भिंत’ या नावाच्या उपक्रमांतर्गत गरजूंना कपडे आणि इतर आवश्यक वस्तुंचे वाटप केले जात आहे. या उपक्रमाला बारामतीकरांकडून उत्स्फुर्त असा प्रतिसाद दिला आहे.
आपल्या घरातील वापरात नसलेले व सुस्थितीतले कपडे तसेच घरगुती साहित्य, चप्पल, बूट, लहान मुलांची खेळणी, थंडीचे कपडे आदी साहित्य समाजातील गरजवंताना देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बारामती शहरातील विविध सामाजिक संघटना आणि संस्थांनी एकत्र येत श्री विमल ग्रुपच्या माध्यामातून ‘माणुसकीची भिंत’ उभारली आहे. या ‘माणुसकीची भिंतीवर शहरातील अनेक जण साहित्य ठेवत आहेत. तर, समाजातील शेकडो गरजवंत या भिंतीवरून आवश्यक त्या वस्तू घेऊन जात आहेत. सध्या या माध्यामातून नागरिकांमधील सामाजिक कार्यात सहभागी होण्याबरोबरच जनजागृती करण्याचे प्रमाण वाढत आहे. तसेच, तरुणांचाही सहभाग वाढत आहे.
हेही वाचा - सोपान महाराजांवर हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत इंद्रायणी घाटावर अंत्यसंस्कार
माणुसकीची भिंत या उपक्रमांतर्गत आपल्या घरातील वापरात नसलेल्या वस्तू या सामाजिक भावनेतून गरजूंना द्यायच्या. तर, ज्यांना या वस्तूंची गरज आहे, त्यांनी त्या घेऊन जायच्या हा प्रयोग सध्या राज्यात सुरू झाला आहे.
हेही वाचा - दिवेघाटातून पालखी सोहळा पुढे जात असताना दुसरी वाहने का सोडली? - सुप्रिया सुळे
सोशल मिडियाद्वारे मिळालेल्या उपक्रमातून पेरणा घेत आम्ही सर्वजण एकञ येऊन माणुसकीची भिंत उभारली आहे. समाजातील गरजूंना मदत व्हावी म्हणून शहरात आवाहान करत 'नको असेल ते द्या, हवं असेल ते घ्या' हा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून वस्तु देणाऱ्या बरोबरच वस्तु घेणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. समाजाचे ऋण म्हणून हा उपक्रम करत असताना आनंद वाटत असल्याचे महेंद्र ओसवाल यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
हेही वाचा - 'त्या' बैलाला पशुवैद्यकीय किंवा वन विभागाच्या मदतीने मारता आले असते - राजू शेट्टी