ETV Bharat / state

बारामतीच्या जनावरांच्या बाजारात कर्नाटकातील व्यापारी व शेतकऱ्यांची रेलचेल

बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारीत असणाऱ्या जळोची येथील उपबाजारात भरणाऱ्या जनावरे बाजाराचा ईटीव्ही भारत ने घेतलेला आढावा.

जनावरे उपबाजार, बारामती
जनावरे उपबाजार, बारामती
author img

By

Published : Feb 21, 2021, 4:24 PM IST

बारामती - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या बाजार पेठांसह ठीकठिकाणी भरणारे जनावरांचे बाजार पूर्णतः ठप्प होते. अलीकडे कोरोनाचा प्रभाव मंदावत असताना पूर्वीप्रमाणेच बाजारपेठा व जनावरांचे बाजार सुरु होतांना दिसत आहे. बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारीत असणाऱ्या जळोची येथील उपबाजारात भरणाऱ्या जनावर बाजाराचा ईटीव्ही भारत ने घेतलेला आढावा.

जनावरे बाजाराचा ईटीव्ही भारत ने घेतलेला आढावा
राज्यातील विविध जिल्ह्यांसह कर्नाटक राज्यातून शेतकरी व व्यापारी आपली जनावरे खरेदी-विक्रीसाठी मोठ्या संख्येने बारामतीच्या बाजारात दाखल होत असतात. त्यामुळे बारामती बाजाराची राज्यात एक वेगळी ओळख आहे. जातिवंत जर्सी गाय, बैल, म्हैस व बैलांची मोठ्या प्रमाणात बारामतीच्या बाजारात खरेदी विक्री होते. या व्यवहारातून बाजार समितीला मोठा नफा होतो. मात्र कोरोना सारख्या जागतिक महामारीमुळे सर्वच व्यवहार बंद असल्याने मागील कोरोना काळात बाजार समितीला लाखो रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.
राज्यासह कर्नाटकातील व्यापारी व शेतकऱ्यांची रेलचेल-
शासनाने घालून दिलेल्या नियमांच्या अधीन राहून तसेच सर्व नियमांचे काटेकोर पालन करत जनावर बाजार आता पूर्वीसारखाच जोमाने सुरू झाला आहे. राज्यातील कोल्हापूर, सांगली, मिरज, उस्मानाबाद, गंगाखेड, धुळे, मालेगाव, जालना, परभणी आदी जिल्ह्यांसह कर्नाटक राज्यातील हुबळी, धारवाड, विरंगुळा आधी जिल्ह्यातून खरीदार बारामती बाजारात दाखल होऊ लागले आहेत. व जनावर बाजार पूर्वीसारखाच सुरू झाला आहे, अशी माहिती बाजार समितीचे वरिष्ठ लिपीक तथा जनावर बाजार प्रमुख दीपक जगताप यांनी दिली.
बैलगाडा शर्यत सुरू करण्याची मागणी-
कोरोनामुळे सर्वच जनावर बाजार बरेच दिवस बंद होते. त्यामुळे आमच्या व्यवसायात मोठी मंदी आली आहे. सध्या जनावर बाजार सुरू झाले आहेत. मात्र जोपर्यंत दुधाला योग्य भाव मिळत नाही. तसेच अनेक दिवसांपासून बंद असलेली बैलगाडा शर्यत जोपर्यंत सुरू होत नाही. तोपर्यंत हा व्यवसाय सुरळीत चालणार नाही. कारण जनावर सजावट सामान विक्री व्यवसाय हा पूर्णतः शेतकऱ्यांच्या जीवावर अवलंबून आहे. त्यामुळे लवकरात लवकर बैलगाडा शर्यत सुरु करावी, अशी मागणी यांनी बोलून दाखवली.
बारामतीच्या जनावर बाजाराची वैशिष्ट्ये-

  • जनावरे बाजाराचा परिसर 11 एकर क्षेत्रात व्यापला आहे.
  • जनावरांसाठी मोठा व सुसज्ज असा गोठा उपलब्ध आहे.
  • जनावरांची ने-आण करणाऱ्या वाहनांसाठी प्रशस्त पार्किंग व्यवस्था.
  • बाजारात लाईट व मुबलक पाण्याची सोय.
  • शेतकरी निवासाची सोय.
  • इतर बाजारांच्या तुलनेत पावतीची आकारणी कमी.
  • देखरेखीसाठी दहा कर्मचारी उपलब्ध

हेही वाचा- कोरोना संक्रमणाचा वेग वाढला, देशात २४ तासांत १४ हजार रुग्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.