बारामती - थकीत कर्जाची नोटीस बजावल्याच्या ( Beaten For Serving Arrears Notice ) कारणावरून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सुपे (ता. बारामती) येथील वरिष्ठ अधिकाऱ्याला बॅंकेतच मारहाण ( Bank Employess Beaten By Coustomer ) करण्याचा प्रकार मंगळवारी (दि.२९) दुपारी बॅंकेच्या शाखेत घडला. अभिनय उर्फ काका कुतवळ यांच्या विरोधात पोलिसांनी याप्रकरणी गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल केला. दत्तात्रय पाडूंरंग कदम (रा. माळेगाव बुद्रूक, ता. बारामती) यांनी याबाबत तक्रार दिली आहे.
कारण नसताना केली मारहाण - कदम यांनी कुतवळ यांचे नातलग सागर अरविंद कुतवळ (रा. कुतवळवाडी, ता. बारामती) यांना सोनेतारण थकीत कर्ज प्रकरणी २९ फेब्रुवारी रोजी नोटीस बजावण्यासाठी मोरगाव येथे गेले होते. तेथून ते परत येत असताना त्यांना कुतवळ यांनी फोन करत काहीही कारण नसताना शिविगाळ केली. तुम्ही शिविगाळ का करता अशी विचारणा त्यांनी केली असताना त्यांनी तु बॅंकेत ये, तुझ्याकडे बघतो, असे म्हणत फोन ठेवून दिला. त्यानंतर दुपारी १ वाजेच्या सुमारास तक्रारदार बॅंकेच्या कर्ज विभागात काम करून अकाऊंट विभागात ते जात असताना सव्वा एकच्या वाजण्याच्या सुमारास कुतवळ हे तेथे येऊन त्यांनी काही एक न विचारता शिविगाळ केली. तसेच मारहाण करत हाताची बोटे पिरगाळत खुर्चीवर ढकलून दिले. तक्रारदार खाली पडल्यानंतर खुर्चीने मारहाण सुरु केली. त्यात तक्रारदाराच्या हाताची करंगळी फ्रॅक्चर झाली आहे. बॅंकेतील कर्मचारी हनुमंत किसन भगत, सुरेश रामचंद्र गायकवाड यांनी भांडण सोडवले. त्यानंतर घडलेल्या प्रकाराबद्दल वरिष्ठांना कल्पना दिली. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्यांना उपचाराची यादी दिली. त्यानुसार होळ प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांनी उपचार घेतल्यानंतर तक्रार दिली.